‘एअरहोस्टेस विनयभंग’ प्रकरणी खुलासा करणार का? लोंढेंचा शिंदे-फडणवीसांना सवाल

‘एअरहोस्टेस विनयभंग’ प्रकरणी खुलासा करणार का? लोंढेंचा शिंदे-फडणवीसांना सवाल

Atul Londhe News : गुवाहाटी पंचतारांकित एअरहोस्टेस विनयभंग प्रकरणाचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) करणार का? असा सवालांची सरबत्ती करीत काँग्रेसचे नेते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, अॅड. असीम सरोदे यांनी गुवाहाटीत शिंदे गटाच्या आमदारांनी एअरहोस्टेसचा विनयभंग व अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला होता. त्यावरुन अतुल लोंढे यांनी हल्लाबोल केलायं.

Aseem Sarode यांचे शिंदे गटावर धक्कादायक आरोप; गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एअर होस्टेसवर अत्याचाराचा प्रयत्न…

अतुल लोंढे म्हणाले, पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग व लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारे असून हा प्रकार करणारे आमदार कोण? याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

ॲड. असीम सरोदे यांनी दोन गंभीर आरोप केले आहेत. एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला व दोन आमदारांना मारहाण करण्यात आली. हे दोन्ही आरोप मन सुन्न करणारे आहेत. मविआ सरकार पाडण्यासाठी खास व्यवस्थेत गुवाहाटीच्या एका पंचतारांकित हॉटेलात आमदारांना ठेवण्यात आले होते आणि यामागे एक ‘महाशक्ती’ आहे हे जगजाहीर होते.

सर्वांना संपवून भापजलाच जिंवत राहायचं; रामदास कदमांच्या टीकेवर थोरात म्हणाले, ‘हा फक्त ट्रेलर…’

हॉटेलमधील वास्तव्यादरम्यान एका एअर होस्टेसचा लिफ्टमध्ये विनयभंग करण्यात आला हा प्रकार सरकारने दीड वर्ष दडपून का ठेवला? महाराष्ट्राच्या जनतेला याची माहिती समजली पाहिजे, सरकारने याची चौकशी करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करावेत, असंही लोंढे म्हणाले आहेत.

Prakash Ambedkar यांचा महाविकास आघाडीला दणका; तीन उमेदवारांची घोषणाही केली

“बेटी बचाओ, बेटी पढाओ, लेक लाडकी,” अशा गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पक्षही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर सत्तेत वाटेकरी आहे. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारा जो प्रकार झाला त्या पापात भारतीय जनता पक्षही तेवढाच वाटेकरी आहे, म्हणून भाजपाने गुवाहाटी हॉटेलमधील प्रकरणावर खुलासा करण्याची हिम्मत दाखवावी, केवळ बेटी बचाओ, महिला सक्षमीकरणाच्या पोकळ गप्पा मारू नयेत, असेही अतुल लोंढे म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube