मनोज जरांगेंशी काही देणं-घेणं नाही, पण त्यांचा बोलवता धनी शोधणारच : देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मनोज जरांगेंशी काही देणं-घेणं नाही, पण त्यांचा बोलवता धनी शोधणारच : देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी, त्यांनी केलेल्या आरोपांशी आणि त्यांनी वापरलेल्या भाषेशी आपल्याला काही देणं-घेणं नाही. पण यामागचा बोलवता धनी शोधणार आहे. लाठीचार्जची घटना झाल्यानंतर कोणाच्या कारखान्यावर बैठका झाल्या, कोण त्यांना रात्री त्यांच्या घरी भेटायला गेले होते. त्यांना रात्री उठवून परत आंदोलनाला कोणी बसवले या सगळ्या गोष्टींचा शोध घेणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी दिला आहे. ते विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलत होते.

मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचे आणि गंभीर वक्तव्यांचे पडसाद आज अधिवेशनात उमटले. सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि विरोधी पक्षांत जोरदार खडाजंगी उडाली. गोंधळ जास्त वाढत असल्याचे पाहून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis has warned that he will find the main facilitator behind Manoj Jarange Patil’s agitation.)

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सखोल चौकशी करा : विधानसभा अध्यक्षांचे गृहविभागाला निर्देश

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन कसे चिघळले? आंदोलनात दगड आणि जेसीबी कुठून आले? कुणाच्या कारखान्यावर बैठका झाल्या? ते दोन सदस्य कोणत्या पक्षाचे होते असा सवाल उपस्थित करत या सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली. त्यांच्या या मागणीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनीही सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या सगळ्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले.

फडणवीस काय म्हणाले?

यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपण मनोज जरांगे पाटील यांचा बोलवता धनी शोधणारच असा इशारा दिला. ते म्हणाले. जो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो, तोच असा आई-बहिणींवरुन शिव्या देतो त्याचे दुःख वाटते. पण माझी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी तक्रार नाहीच. मी त्यांच्या मागील बोलवता धनी शोधणार आहे.

Rajya Sabha : राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान; सपा-काँग्रेससह विरोधकांची वाढली ‘धाकधूक’

सप्टेंबर महिन्यात झालेल्या लाठीचार्जनंतर आंदोलन चिघळले, असे म्हटले जाते. लाठीचार्जनंतर झालेही असेल. पण त्याचबरोबर कशाप्रकारे रात्री जाऊन मनोज जरांगे पाटील यांना परत आणले. त्यांच्या घरात जाऊन कोण भेटले, कोणाकडे बैठक झाली या सगळ्याची चौकशी करणार आहे. आता आरोपी देखील सांगत आहेत, की यांच्या सांगण्यावर आम्ही दगडफेक केली. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागील बोलवता धनी शोधणार असा इशारा फडणवीस यांनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube