Aseem Sarode यांचे शिंदे गटावर धक्कादायक आरोप; गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एअर होस्टेसवर अत्याचाराचा प्रयत्न…

Aseem Sarode यांचे शिंदे गटावर धक्कादायक आरोप; गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एअर होस्टेसवर अत्याचाराचा प्रयत्न…

Aseem Sarode : वकिल असीम सरोदे ( Aseem Sarode ) यांनी शिंदेंच्या बंडावेळी ( Shinde Group ) घडलेल्या घटनेचे गौप्यस्फोट करत बंडखेर आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. सरोदे म्हणाले की, गुवाहाटीच्या ज्या हॉटेलमध्ये शिंदेंचे आमदार थांबले होते. त्याठिकाणी असलेल्या एअर होस्टेसवर विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी कोणत्याही आमदाराचं नाव घेतलं नसलं तरी त्यांनी सर्व आमदारांचा उल्लेख करत हा गौप्यस्फोट केला. सरोदे हे रविवारी धाराशिवमध्ये निर्भय बनो या कार्यक्रमामध्ये बोलत होते.

काय म्हणाले असीम सरोदे?

धाराशिव येथे रविवारी संध्याकाळी निर्भय बनो ही सभा पार पडली. यावेळी वकील असीम सरोदे यांनी भाषण करताना शिंदे गटाच्या बंडा वेळी गुवाहाटीमध्ये काय-काय घडलं होतं. याबद्दल काही दावे केले. यामध्ये त्यांनी सुरुवातीला सांगितलं की, गुवाहाटी मधल्या त्या हॉटेलमधून एक आमदार पळून गेले. आठ किलोमीटर गेल्यानंतर त्यांना पकडून आणलं. त्यावेळी त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली. तसेच आणखी एक आमदाराला देखील त्यावेळी मारहाण करण्यात आली होती. मात्र या आमदारांना कोणी मारहाण केली? असा सवाल यावेळी सरोदेंनी उपस्थित केला.

मोठी बातमी : खासदार अन् आमदारांना घाम फोडणारा निर्णय; सुप्रीम कोर्टाने रद्द केला 1998 चा निर्णय

तसेच सरोदे यांनी यावेळी आणखी एक मोठा गौप्यस्फोट आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केला. ते मिळाले शिंदे यांचे बंडखोर आमदार ज्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये थांबले होते. त्याच हॉटेलमध्ये काही एअर होस्टेस देखील थांबलेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला? हे शोधलं पाहिजे. हे सगळे नेते तिथं दारूच्या नशेत होते. मात्र हा पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही. असं आवाहन यावेळी सरोदे यांनी उपस्थित त्यांनी केलं.

नितीनजी हवेत की दुसरा उमेदवार? निरीक्षकांची विचारणा; गडकरींच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह!

दरम्यान शिंदे गटाकडून सरोदे यांच्या या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच सरोदे यांनी देखील कोणत्याही विशिष्ट आमदाराचे याप्रकरणी नाव घेतलं नसलं. तरी त्यांनी यावेळी त्या हॉटेलमध्ये थांबलेल्या शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या या बंडाला दोन वर्ष उलटून गेली असली. तरी देखील त्याबद्दल वेगवेगळे दावे अद्यापही समोर येताना पाहायला मिळत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज