Maharashtra Politics : नव्या सरकार स्थापनेचा मुहुर्त ठरला? सरोदेेच्या दाव्याने खळबळ
Ad. Aseem Sarode claim about new Government : 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार असल्याचा दावा कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मे च्या आधी नक्की होतील. तर त्यानंतर 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की आहे.
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष,अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मे च्या आधी नक्की होतील.
11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की.— Asim Sarode (@AsimSarode) May 3, 2023
गेल्या महिनाभरापासून राज्याच्या राजकारणात विविध घटना, घडामोडी आणि चर्चांना वेग आला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजिर पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा होतात. त्या दरम्यान ते नॉटरिचेबल होतात. पक्षातील त्यांचा गटही त्यांचा जो काही निर्णय असेल त्याला आपला पाठिंबा असल्याचे सांगतो. मात्र लगेचच स्वतः अजित पवार माध्यमांसमोर येत आपण कुठेही न जाता राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं सांगतात.
त्यानंतरची क्रोनोलॉजी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाच्या चेंबूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या युव संवाद कार्यक्रमात तरुणांना सक्रिय करायचे असेल तर त्याना पक्षात विविध पद दिली गेली पाहिजे. आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. अशा शब्दांत शरद पवार यांनी पक्षात होऊ घातलेले बदल याचे संकेत दिले. तरुणांना संधी दिली गेली पाहिजे. तरुणांना पक्षात घ्यावे असे मी नेत्यांना सांगेल. जे लोक संघटनेत काम करतात त्यांना सांगण आहे की पाच ते सहा वर्ष युवक चळवळीत काम करणाऱ्यांना संघटनेत घ्या. याठिकाणी त्यांनी काम प्रस्तावित केलं तर त्यांना महापालिकेसाठी संधी द्या, असे शरद पवार म्हणाले होते.
त्यानंतर लगेचच राज्य विधिमंडळाच्या अत्यंत महत्वाच्या अशा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे तरुण आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे नाव सुचवले आहे. पक्षातील अन्य ज्येष्ठ नेते मंडळींना बाजूला करून थेट रोहित यांचे नाव सुचविण्यात आल्याने राष्ट्रवादीत खरेच भाकरी फिरली, अशीही चर्चा सुरू झाली.
मात्र त्यानंतर आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली ती. स्वतः शरद पावारांच्या निवृत्तीच्या घोषणेची. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या घोषनेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, 5 तारखेला त्यांचा राजीनामा मंजुर होणार की, नाही कळेल.
Shalinitai Patil : अजित पवार हे Scammer, त्यांना पक्षाध्यक्ष पद देणं अयोग्य
दरम्यान ते राजीनामा कितपत मागे घेतली, याविषयी शंका आहे. पवार यांनी निवृत्ती स्वीकारल्यावर NCP बरोबरच महाविकास आघाडीत कमालीची अस्वस्थता आहे. दरम्यान, पवाराच्या या निर्णयामुळं पवारांच्या जागी आता कोण राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष होणार, याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहे. पुढचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे दरम्यान, पक्षाध्यक्षपदासाठी अजित पवार (Ajit Pawar) की सुप्रिया सुळे (Supriya Sule) अशी चर्चा सुरू आहे.
त्यामध्येच आता कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार असल्याचा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मे च्या आधी नक्की होतील. तर त्यानंतर 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की आहे.