भाजपचे प्रदीप कंद राष्ट्रवादीच्या वाटेवर : अमोल कोल्हेंविरोधात अजितदादांचा जुन्या शिलेदार मैदानात ?
पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, भाजप (BJP) नेते प्रदीप कंद (Pradip Kand) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाटेवर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये कंद राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. कंद यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची बातमी येताच त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. (BJP leader Pradeep Kand will join the NCP in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar.)
कोण आहेत प्रदीप कंद?
प्रदीप कंद यांचे राजकारण राष्ट्रवादीच्या तालमीत घडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुशील वाढलेले कंद यांना कधीकाळी त्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने कंद यांना सुरूवातीला उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर कंद यांना 2014 मध्ये विधानसभा उमेदवारीची अपेक्षा होती, मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही.
“मी स्वतः मतं मागते, नवऱ्याला फिरवत नाही” : सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना टोला, नणंद-भावजय वाद तापला
त्यानंतर त्यांनी 2019 च्या निवडणुकीपूर्वी कंद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2022 मध्ये झालेल्या पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कंद यांनी भाजपकडून मैदानात उडी घेतली. त्यावेळी कंद यांच्या पराभवासाठी स्वतः अजित पवार यांनी दंड थोपटले होते. कंद यांना जागा दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. पण त्यानंतरही कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांचा पराभव केला. कंद यांचा हा विजय अजित पवार यांना चांगलाच जिव्हारी लागला होता.
धक्कादायक! हरियाणात आज्ञातांकडून गोळीबार, INLD च्या प्रदेशाध्यक्षांची हत्या
त्यानंतर हेच कंद आता पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना शिरुरची जागा आपण जिंकणार असा निर्धार करत अमोल कोल्हे यांचा पराभव करणारच असे आव्हान अजित पवार यांनी दिले होते. त्यामुळे आता कंद यांना पक्षात घेऊन जुन्या शिलेदाराल मैदानात उतरवर शिरुर जिंकण्याच अजित पवार यांचा प्लॅन आहे का? असा सवाल विचारला जात आहे.