धक्कादायक! हरियाणात आज्ञातांकडून गोळीबार, INLD च्या प्रदेशाध्यक्षांची हत्या
INLD State President killed : इंडियन नॅशनल लोकदल ( INLD ) या पक्षाचे हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष नफेसिंह राठी ( Nafe singh rathi ) त्यांच्यावर रविवारी अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर राठी यांना तात्काळ होणाऱ्या दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. झज्जर जिल्ह्यातील बहादूर गड या ठिकाणी ही घटना घडली.
राठी हे आपल्या कार मधून प्रवास करत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. यामध्ये त्यांच्या तीन खाजगी अंगरक्षकांना देखील गोळ्या लागल्या आहेत त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. राठी यांच्यासह आणखी एका कार्यकर्त्याचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
‘मला राजकारणात अपघाताने… खुलं पत्र लिहित अजितदादांकडून वेगळ्या निर्णयामागची भूमिका स्पष्ट
त्यावर काँग्रेस नेते आणि माझे मुख्यमंत्री भूपेंदर सिंग हुड्डा यांनी प्रतिक्रिया देत राज्यातील कायदा आणि व्यवस्थेवर टीका केली आहे. ते म्हणाले की हरियाणातील इंडियन नॅशनल लोक दल या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंह राठी यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. ही बातमी अत्यंत दुःखद आहे. रतन राज्याची कायद्याने सुव्यवस्था बिघडली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोणीही सुरक्षित नाही. राठी यांना श्रद्धांजली आणि त्यांच्या परिवारासाठी संवेदना. तसेच हल्ल्यात जखमी झालेल्या सुरक्षारक्षक लवकर बरे व्हावेत. अशी प्रार्थना. अशी प्रतिक्रिया हुड्डा यांनी दिली आहे.
हरियाणा में इनेलो प्रदेश अध्यक्ष श्री नफे सिंह राठी जी की गोली मार कर हत्या करने का समाचार बेहद दुःखद है।
यह प्रदेश की कानून व्यवस्था को दर्शाता है। इस घटना ने स्पष्ट कर दिया कि कानून व्यवस्था का दिवाला पिट चुका है। प्रदेश में आज कोई भी अपने आपको सुरक्षित महसूस नहीं कर पा रहा…
— Bhupinder S Hooda (@BhupinderShooda) February 25, 2024
राठी यांच्या बद्दल सांगायचं झालं तर ते बहादूरगडमधून दोन वेळा आमदार होते. तसेच सध्या ते इंडियन नॅशनल लोकदल या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. दरम्यान जानेवारी 2023 मध्ये हरियाणा पोलिसांनी माजी मंत्री मांगे राम नुंबेरदार यांचा मुलगा आणि स्थानिक भाजप नेता जगदीश नुंबेरदार याच्या आत्महत्या प्रकरणी मराठी तसेच इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे ही हत्या याच प्रकरणातून झाली का असं संशय देखील व्यक्त केला जातोय.