मोठी बातमी : संचारबंदीनंतर मनोज जरांगेंची माघार; ‘सागर’ बंगल्यावर निघालेला मोर्चा पुन्हा अंतरवालीकडे!

मोठी बातमी : संचारबंदीनंतर मनोज जरांगेंची माघार; ‘सागर’ बंगल्यावर निघालेला मोर्चा पुन्हा अंतरवालीकडे!

जालना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis )यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) यांनी अखेर माघार घेतली आहे. जालन्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर जरांगे यांनी भांबेरीतून पुन्हा अंतरवालीकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र संचारबंदी उठवा, सागरवर आलोच समजा असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

काल (25 फेब्रुवारी) देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत जरांगे पाटील सागर बंगल्यावर उपोषण करण्यासाठी निघाले होते. मात्र त्यांची ढासळलेली तब्येत पाहुन भांबेरी गावातील ग्रामस्थांनी त्यांना अडवून उपचार घेण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी तेथेच मुक्काम केला. मात्र प्रशासनाने खरबदारीचा उपाय म्हणून आजपासून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यापार्श्वभूमीवर जरांगे यांनी भांबेरीतून आंतरवालीकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे जाऊन ते आता आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार आहेत.

‘मला राजकारणात अपघाताने… खुलं पत्र लिहित अजितदादांकडून वेगळ्या निर्णयामागची भूमिका स्पष्ट

यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, मला काहीही झाले नाही. लोकांना परत पाठवण्यासाठी हे सर्व सुरू आहे. मात्र आपण पोलीस आणि कायद्याचा सन्मान करू. पोलिसांना कोणीही त्रास द्यायचा नाही. आपण आंतरवाली सराटीत परत जाऊ. दोन तास चर्चा करून, पुढची दिशा ठरवू, निर्णय घेऊ. सर्वांनी शांततेत धरणे आंदोलन चालू ठेवा, असे आवाहनही यावेळी जरांगे यांनी केले. तसेच यावेळी जरांगे यांनी फडणवीस यांचा पुन्हा एकदा एकरी उल्लेख करत त्याला सगळी सोयऱ्याची अंमलबजावणी करावीच लागेल, अशी मागणी सरकारकडे केली.

Weather Update : आज राज्याच्या ‘या’ भागात अवकाळीची शक्यता तर विदर्भाला ऑरेंज अलर्ट जारी

पण फडणवीस पोलिसांच्या आडून काम करत आहे. त्यामुळे मराठ्यांनी आता विचार करून पुढचे पाऊल टाकावे. फडणवीसांचा डाव रात्रीच आंदोलन चिरडून टाकण्याचा होता. त्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली, आमच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र आम्ही हा डाव मोडून काढला. राज्यकर्त्याला रात्रीच्या वेळी महिलांवर हात उचलणे शोभत नाही. त्यामुळे महिलांना जर काय झाले असते तर हे राज्य पेटले असते. मात्र आम्हाला असे होऊ द्यायचे नव्हते. मी तुझे डाव ओळखून आहे. फक्त संचार बंदी उठवा, मग मी सागर बंगल्यावर आलोच म्हणून समजा असा इशारा दिला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube