Devendra Fadanvis यांच्याकडून उदयनराजेंची भेट, लोकसभा उमेदवारीच्या चर्चांना उधाण

Devendra Fadanvis यांच्याकडून उदयनराजेंची भेट, लोकसभा उमेदवारीच्या चर्चांना उधाण

Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांची त्यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे त्यांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा उमेदवारीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण नुकतीच त्यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

जरागेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी; अंबादास दानवेंची मागणी

खासदार उदयनराजे भोसले यांचा काल नुकताच वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे त्यांची भेट घेऊन, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या असून, खासदार उदयनराजे भोसले यांचे देवेंद्र फडणवीस यांनी खास भेट घेतल्याने आगामी काळात सातारा लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजेच असतील अशी चर्चा आता साताऱ्यात रंगू लागली आहे.

फडणवीस…गोळ्या घाल अन् बळी घे मी तयार; जरांगेंची स्वारी ‘सागर’ बंगल्याकडे

दरम्यान उदयनराजे भोसले यांनी काल त्यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी त्यांनी यंदा आपण सातारा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं असल्याचे संकेत दिले. त्यामुळे ते सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा अजित पवार यांच्या पक्षाला मिळणार की भाजपही जागा स्वतःकडे ठेवणार यावर चर्चा सुरू झाली आहे.

उदयनराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले होते की, निवडणूक लढावी ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यानुसार मलाही वाटतं लोकांच्या माध्यमातून लोकांच्या सभागृहात जावं लोकांचे प्रश्न मांडावेत. त्यामुळे निवडणूक लढण्याची आपली ही इच्छा आहे. त्यात गैर काहीही नाही. त्यांच्या या विधानानंतर लगेचच फडणवीसांनी त्यांची घेतलेली भेट यामुळे उदनराजेंच्या लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज