Hariyana Violence : नूहमध्ये कर्फ्यूमध्ये तीन तासांची शिथिलता पण इंटरनेट…

Hariyana Violence : नूहमध्ये कर्फ्यूमध्ये तीन तासांची शिथिलता पण इंटरनेट…

हरियाणातील नूहमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता 8 ऑगस्टपर्यंत इंटरनेट सेवांवर बंदी घालण्यात असून कर्फ्यूमध्ये 3 तासांची शिथिलता देण्यात आली आहे. ज्या हॉटेलमधून गुंडांनी यात्रेवर दगडफेक केली, हॉटेल बेकायदेशीर ठरवत प्रशासनाने हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाने या हॉटेलवर बुलडोझर चालवून पाडण्यात आलं आहे. याच हॉटेलमधून गुंडांनी यात्रेवर दगडफेक केली होती.

मणिपूर, हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट; राऊतांच्या गंभीर आरोपांनी खळबळ!

बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषदेकडून हरियाणातील नूहमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जलाभिषेक यात्रेत 31 जुलै रोजी हिंसाचार घडला. या हिंसाचारामध्ये दोन होमगार्ड जवानांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत.

Dcm Ajit Pawar : ‘महाआरोग्य शिबिरातून नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार’

हिंसाचारामुळे शहरातील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंसाचारादरम्यान, घराचे दरवाजे आणि खिडक्याही बंद करुन जीव मुठीत धरुन लोक बसल्याचं दिसून आलं होतं. नूहमध्ये घडलेला हा तब्बल 3 दशकानंतरचा हिंसाचार आहे. यापूर्वी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन हिंसाचार घडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा नूहमध्ये हिंसाचार घडल्याचं पाहायला मिळालं आहे.

मोठी बातमी : तोषखाना प्रकरणात इम्रान खान दोषी, न्यायालयाकडून 3 वर्षांची शिक्षा; लाहोरमधून अटक

हिंसाचाराच्या घटनेनंतर नूहमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. आता इंटरनेट सेवेची बंदी 8 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच प्रशासनाने कर्फ्यूमध्ये 3 तासांची शिथिलता देण्यात आली आहे.

दरम्यान, विश्व हिंदु परिषदेद्वारे बृजमंडळ जलाभिषेक यात्रेचं आयोजन करण्यात आलं. या यात्रेदरम्यान एका टोळीकडून अचानक यात्रेवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतरच हिंसाचार उफाळून आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube