Dcm Ajit Pawar : ‘महाआरोग्य शिबिरातून नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार’
Dcm Ajit Pawar : महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात आज महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्य शासन, सोमेश्वर फाऊंडेशन, निरामय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.
मोठी बातमी : तोषखाना प्रकरणात इम्रान खान दोषी, न्यायालयाकडून 3 वर्षांची शिक्षा; लाहोरमधून अटक
अजित पवार म्हणाले, कोविड काळाने आरोग्यसेवा सर्वात जास्त महत्वाची असल्याचे दाखवून दिले. राज्य शासनानेदेखील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आरोग्यसेवेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये २१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
चीनमध्ये फक्त दोनच तास फोन वापरण्याची परवानगी? कायदाच पारित होणार…
राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २ हजार ४१८ संस्थांमध्ये नि:शुल्क उपचार होणार आहेत. राज्यात ॲडेनो व्हायरसमुळे डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून पुण्यात साथीचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी, असं आवाहन पवार यांनी केलं आहे.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुरेश नवले, अर्जुन खोतकर, आमदार प्रसाद लाड, सिद्धार्थ शिरोळे, सनी निम्हण, आरोग्य संचालक डॉ.अजय चंदनवाले आणि राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.