‘आरक्षण हे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’, भुजबळांचा जरांगे पाटलांना टोला

‘आरक्षण हे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’, भुजबळांचा जरांगे पाटलांना टोला

Chhagan Bhujbal : राज्यात सध्या आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करत आहे तर दुसरीकडे वडीगोद्री येथे गेल्या दहा दिवसांपासून लक्ष्मण हाके (Laxman Hake) मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी उपोषण करत होते.

आज वडीगोद्री येथे मंत्र्यांचं शिष्टमंडळ ओबीसी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. या शिष्टमंडळामध्ये मंत्री छगन भुजबळ, उदय सामंत, गिरीश महाजन , अतुल सावे , धनंजय मुंडे , गोपीचंद पडळकर , समीर भुजबळ , प्रकाश शेंडगे , शब्बीर अन्सारी , संतोष गायकवाड , प्रशांत जोशी  आणि अजय पाटणे यांचा समावेश होता. या शिष्टमंडळने आंदोलन स्थगिती करण्याची विनंती केली होती. त्यांच्या या विनंतीनंतर आज लक्ष्मण हाके यांनी आपलं आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे.

मात्र त्यापूर्वी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. आरक्षण हे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. अन्याय झालेला समाज हळूहळू पुढे यावा यासाठी आरक्षण आहे असं भुजबळ म्हणाले. त्यांना स्वातंत्र्य आरक्षण द्या आम्ही त्याला पाठिंबा देणार अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी बोलताना दिली.

तर जातनिहाय जनगणनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा पाठिंबा असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) पाडलं त्यांनी कोणाचा विरोध केला नव्हता मात्र तरीही त्यांना पाडलं. जर असं असेल तर आम्हाला देखील राजकीय आरक्षण द्या. सरकारने लोकसभा आणि विधानसभेत आम्हाला आरक्षण द्यावे अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली. यापूढे जर तुम्ही सर्व एकत्र राहिले तर तुमचं आरक्षण टिकेल असेही भुजबळ म्हणाले.

आता मागे हटायचा नाही. हातावर हात धरून बसलो तर काहीच होणार नाही. ओबीसींना प्रमाणपत्र पाहिजे असेल तर 10 महिने थांबावं लागते. अन्याय झालेल्या समाजाने पुढे यावे असं देखील भुजबळ म्हणाले. तसेच काल झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. काही मागण्यांवर निर्णय देखील झाला आहे असं भुजबळ म्हणाले.

Laxman Hake : मोठी बातमी ! लक्ष्मण हाके यांचे आंदोलन मागे

तर मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत भुजबळ म्हणाले की , आम्ही कोणालाही धमक्या देत नाही. आम्ही कोणालाही घाबरत नाही. जेव्हा लोकशक्ती एकत्र येते तेव्हा धनशक्तीचा पराभव होतो. लोकशक्ती ही सर्वात मोठी शक्ती असते. त्यांची दादागिरी कधी थांबणार? आमच्यावर अन्याय कधी थांबणार? असा सवाल उपस्थित करत त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. तसेच जे खोटे दाखले देत आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज