कार्यक्रमाला उशिरा का आलात? नाना पाटेकरांनी घेतली धनंजय मुंडेंची शाळा!

कार्यक्रमाला उशिरा का आलात? नाना पाटेकरांनी घेतली धनंजय मुंडेंची शाळा!

Nana Patekar : राजकीय नेत्यांना एकाच दिवशी अनेक कार्यक्रम असतात. त्यामुळं त्यांनी अनेक कार्यक्रमांना पोहोचण्यास बऱ्याचदा उशीर होतो. त्यामुळे अनेकदा कार्यक्रमांचा खोळंबा होता. अशाच एका कार्यक्रमात कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उशिरा पोहोचल्यानं अभिनेते नाना पाटेकरांनी (Nana Patekar) त्यांची भर कार्यक्रमात चांगलीच शाळा घेतली. उशीरा का आलात? असा आलात असा थेट सवाल पाटेकरांनी केला.

भारतात उष्णतेची भयंकर लाट! तीन महिन्यांत तब्बल 110 मृत्यू; उष्माघात विभाग सुरू करण्याच्या सूचना 

लोकमत समुहातर्फे लोकमत सरपंच पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. नाना पाटेकर आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. नाना पाटेकर यांचं मंचावर भाषण सुरू असतांना धनंजय मुंडेंची एन्ट्री झाली. मुंडेंची एन्ट्री होताच नानांनी म्हटलं की, मुंडे साहेब एकदम वेळेवर आले आहेत. पुढं बोलावून नानांनी त्यांना म्हटलं की, उशीरा का आलात ते सांगा पहिल्यांदा? नाना पाटकरांनी थेट कृषीमंत्र्यांना केलेला सवाल पाहून कार्यक्रमातील मंडळींना आणि खुद्द धनंजय मुंडेंनाही हसू आवरता आलं नाही. सध्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रीगोंद्यात महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाच्या नेत्याने रणशिंग फुंकलं… 

दरम्यन, धनंजय मुंडे म्हणाले, मी माझ्या भाषणात उशिरा का आलो ते सांगतो. तर नाना म्हणाले, भाषणात नाही, आत्ता सांगा. त्यावर धनंजय मुंडे म्हणाले की, खरंतर नानांच्या समोर पुढारी जरी असलो तरीही खोटं बोलता येत नाही. खरंच सांगतो, थोडासा पॅनक्रिया आणि इंटेस्टाईनचा आजार आहे.. आज सकाळी त्यासाठी डॉक्टरांकडे जायचे होतं. डॉक्टरांकडे जायला थोडा उशीर झाला, त्यामुळे इथे यायला उशीर झाल्याचं मुंडे म्हणाले.

दरम्यन, या कार्यक्रमाला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आदी उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube