बीडमध्येच शेतकऱ्यांची सर्वाधिक फसवणूक; संभाजीराजेंकडून कृषिमंत्री धनंजय मुंडे टार्गेट

बीडमध्येच शेतकऱ्यांची सर्वाधिक फसवणूक; संभाजीराजेंकडून कृषिमंत्री धनंजय मुंडे टार्गेट

Pune News : राज्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली असून पेरण्या होत आहेत. याच काळात शेतकऱ्यांकडून खतांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. मात्र या व्यवहारात शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक होत आहे. एक युरियाची गोणी एमआरपीपेक्षा तिप्पट दराने विक्री होत आहे. या धक्कादायक प्रकाराचा खुलासा स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे मार्केट यार्ड परिसरात स्टिंग ऑपरेशनद्वारे केला. सरकारने या प्रकारांची दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याच बीडमध्ये शेतकऱ्यांची सर्वाधिक फसवणूक होत असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. आज पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीराजेंनी शेतकऱ्यांच्या फसवणणुकीच्या गंभीर गंभीर प्रकारांचा खुलासा केला.

अभिनंदन बाबा! तिकीटासाठी एकदाही दिल्लीला न जाता…; संभाजीराजेंची शाहू महाराजांसाठी भावनिक पोस्ट

स्वराज्य पक्षाने शेतकऱ्यांसाठी हेल्पालाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनद्वारे शेतकऱ्यांनी आमच्याकडे खते, बी बियाणे, युरिया यांची वाढीव दराने विक्री केली जात असल्याच्य असंख्य तक्रारी केल्या आहेत. खतांचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. या तक्रारींतील सत्यता तपासून पाहण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे शहरातील मार्केट यार्ड येथील खत विक्रीच्या दुकानांत जाऊन युरिया खरेदी केला. एमआरपीपेक्षा तिप्पट दराने युरियाची विक्री होत असल्याचे यातून समोर आले आहे. या प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण आमच्याकडे आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

कृषिमंत्र्यांच्याच बीडमध्ये शेतकऱ्यांची सर्वाधिक फसवणूक

युरिया मिळवण्यासाठी सामान्य शेतकऱ्याला किती त्रास होत असेल. शेतकऱ्यांना फसवणारं एक मोठं रॅकेट आहे. शेतकऱ्यांना GST चाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना GST बाबत काहीही माहिती नाही. कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाई होत नाही. विशेष म्हणजे, महाराष्ट्राला कृषी आयुक्त नाही. सर्वात जास्त फसवणूक बीड जिल्ह्यात होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात फसवणुकीला सुरुवात झाली आहे. 260 रुपयांचं युरियाचं पोतं 800 रुपयांना विकलं जात आहे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

आजच्या स्वार्थी जगात आपली मैत्री; रक्षा खडसेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच प्रितम मुंडेंची भावनिक पोस्ट

राज्याला कृषी आयुक्त नाही

राज्याच्या कृषी आयुक्तांना निवेदन देत जादा दराने खतांची विक्री होत असल्याची माहिती दिली होती. या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र दोनच दिवसात कृषी आयुक्तांची बदली झाली त्यानंतर सद्य स्थितीत राज्याला कृषी आयुक्त नाही ही धक्कादायक बाब आहे, असे त्यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज