आजच्या स्वार्थी जगात आपली मैत्री; रक्षा खडसेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच प्रितम मुंडेंची भावनिक पोस्ट
Pritam Munde Post on Raksha Khadse : भाजपकडून बीड लोकसभेच्या माजी खासदार प्रितम मुंडे यांनी एक भावनीक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या इस्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट (Pritam Munde) प्रितम मुंडे यांनी आपल्या मैत्रिण आणि त्यांच्या लोकसभेतील सहकारी भाजप खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत केली आहे. तसंच, रक्षा खडसे यांना यावेळी मंत्रिपद मिळालं आहे. (Raksha Khadse) त्याबद्दल त्यांनी अभिनंदनही केलं आहे. त्याचबरोबर प्रितम मुंडे यांनी 10 वर्षाच्या काळातील आठवणींना उजाळाली दिला आहे.
आजच्या एवढ्या स्वार्थी जगात Raksha Khadse: पोलीस हप्ते मागतात; खाजगी वाहनचालकांची तक्रार
रक्षा खडसे या मंत्री झाल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी मुलाखती दिल्या. यावेळी एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, प्रितम मुंडे संसदेत सोबत नसतील म्हणून मला रडू आलं. त्यांचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यानंतर प्रितम मुंडे यांनी देखील पोस्ट शेअर करत रक्षा खडसेंना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रितम मुंडे यांनी यंदा निवडणूक लढवली नाही. त्यामुळे त्या संसदेत जाऊ शकणार नाहीत. मात्र, जिवाभावाची मैत्रिण रक्षा खडसे केंद्रात मंत्री होताच प्रितम यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखी आहे, असं प्रितम मुंडे म्हणाल्या आहेत. त्यांची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
काय आहे प्रितम मुंडे यांची पोस्ट पराभव जिव्हारी! मुंडे समर्थकाने स्वत:ला संपवलं; पंकजा भावूक तुम्हाला मुंडे साहेबांची शप्पथ
10 वर्ष ही खूप काही देऊन गेली , बहुतेक चांगलंच. मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यापेक्षा आपली मैत्रीण संसदेत नाही म्हणून गहिवरून येणारी तू ! रक्षा ;आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखीच आहे.. पक्षातील निवडणूक निरीक्षकांना एकमेकांच्या शिफारसी करणाऱ्या, स्वतःच तिकीट जाहीर झालं की नाही यापेक्षा मैत्रिणीचं तर झालं न हे बघणाऱ्या, निकालाच्या दिवशी स्वतःचे उतार चढाव हाताळताना देखील एक नजर कायम दुसरीच्या निकालाकडे ठेवणाऱ्या. १० वर्ष सतत संसदेत शेजारी बसणाऱ्या, पक्षाच्या बैठकांना एकत्रच जाणाऱ्या, दिल्लीत एकाच मजल्यावर राहणाऱ्या, एकमेकींना राजकीय घटनांपासून कपड्यांच्या रंगसंगतींपर्यंत सल्ले देणाऱ्या आपण . संसदेतली विधेयकांची चर्चा करणाऱ्या आपण, अनेक देवदर्शनांना देखील एकत्रच गेलो! १० वर्षातला प्रवास तुमच्या सगळ्यांच्याच सोबतीने खूप छान झाला, पण तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होत आणि नेहमी राहील. आजच्या या स्वार्थी जगात निस्वार्थ मैत्री जपणारी माझी मैत्रीण रक्षा तुला या यशाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि तुझ्या हातून आजपर्यंत घडलं तसंच चांगलं कार्य घडो, सतत लोकसेवा तुझ्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अशा शब्दांत प्रितम मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.