Raksha Khadse : महिला अत्याचारावर रक्षा खडसे स्पष्टच बोलल्या… हा लोकांच्या मानसिकतेचा परिणाम

Raksha Khadse : महिला अत्याचारावर रक्षा खडसे स्पष्टच बोलल्या… हा  लोकांच्या मानसिकतेचा परिणाम

जळगाव : वारंवार होणाऱ्या महिला व मुलींवर अत्याचार या प्रश्नावर रावेर लोकसभा मतदारसंघाचे खासदार रक्षा खडसे (raksha khadse) यांनी आपले मत व्यक्त केले. खडसे म्हणाल्या सरकार म्हणून महिला प्रतिनिधी म्हणून एक महिला म्हणून अनेक असे संघटनेच्या माध्यमातून या विषयांना आम्ही विरोध केला आहे.

वेळोवेळी पोलीस प्रशासन असेल किंवा सरकार असेल यांना सुद्धा सूचना देण्यात आलेले आहेत. पण घटना या घडतात लोकांच्या मानसिकतेच्या परिणाम आपण म्हणू शकतो. या घटनांना रोखण्यासाठी लोकांची मानसिकता बदलणं फार महत्वाचं आहे असे खडसे यांनी सांगितले आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अडीचशे शाळांचे वीजबिल थकबाकीमुळे कनेक्शन कट करण्यात आले, त्यात रावेर लोकसभा मतदारसंघातील काही शाळा आहेत. यावर बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या, जिल्हा परिषदेचे शाळा आहेत त्या सरकारी असल्यामुळे याचे जे मीटर आहे ते व्यावसायिक न येता घरगुती आल पाहिजे.

दरम्यान या गोष्टीसाठी बऱ्याच वर्षापासून आम्ही पाठपुरावा केला आहे. मधल्या काळामध्ये सरकारने ते केलं सुद्धा होतं परत तोच विषय समोर आलेला आहे. घरगुतीचे दर यांना लागू केले पाहिजे. सरकारी शाळा असल्यामुळे त्यासंदर्भाबद्दल पाठपुरावा आम्ही सरकारकडे केला असल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube