‘रक्षाने राजीनामा द्यावा, हा फालतूपणा चालणार नाही’…विजय चौधरी अन् महाजनांची कथित ऑडिओ क्लिप!
भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील एक खळबळजनक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Girish Mahajan & Vijay Choudhari Audio Clip : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी (Vijay Choudhari) यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दिसत आहे. कथित संवादामुळे भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याच दिसून येत आहे. ऑडिओ क्लिपबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही परंतू हा चर्चेचा विषय ठरत आहे.
आमच्या घराण्याचा इतिहास 100 वर्षाचा… तुमचं काय?, भाजपसह मोदींवर ठाकरेंचा जोरदार प्रहार
महाजन आणि चौधरी यांच्या संवादामध्ये रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. खडसे सातत्याने भाजपवर टीका करतात मग सुनेला मंत्रिपद का? असाही सवाल या कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. रक्षा खडसेला आपण मंत्री बनवून ठेवलंय, तिला काढलं पाहिजे हे कुठेतरी थांबले पाहिजे, उठले सुटले घाणेरडे काहीही आरोप करीत आहे, त्यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, असं संवादात आहे. त्यावर गिरीश महाजन हम्म..करत असल्याचा उल्लेख आहे.
अहिल्यानगरमध्ये ‘अॅट्रॉसिटी’च्या खटल्यांसाठी विशेष न्यायालयाची स्थापना, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
विजय चाैधरी यांनी म्हटले की, तुम्ही सांगा काय करायचे. प्रत्येक वेळेस काहीही झाले तरीही तुमच्यावर येतो दादा… ******** देणे आणि घेण्याचे काहीही त्यात तथ्य नसते. आपण काहीतरी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला सांगितले पाहिजे, असे चालणार नाही आणि दुहेरी भूमिका चालणार नाही. एकदर रक्षाने राजीनामा द्यावा हे फालतूपणा चालणार नाही. भाऊ.. सगळे एका घरात खडसेही मुलगीही पण..
दरम्यान, भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपने मोठी खळबळ उडाली. थेट रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.