मोठी बातमी : नारायण राणेंची खासदारकी जाणार?; मुंबई हायकोर्टाकडून राणेंना समन्स

  • Written By: Published:
मोठी बातमी : नारायण राणेंची खासदारकी जाणार?; मुंबई हायकोर्टाकडून राणेंना समन्स

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आलेल्या नारायण राणेंच्या (Narayan Rane) अडचणीत वाढ झाली असून, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनायक राऊत (Vinayak Raut) लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. मात्र, त्यांना राणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर राऊतांनी राणेंची निवडणूक रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने नारायण राणेंना समन्स बाजावले असून, राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Bombay High Court Issues Summons To MP Narayan Rane )

 

राऊतांचे राणेंवर गंभीर आरोप

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील (Loksabha Election) भाजप खासदार नारायण राणे यांच्या निवडीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. राणे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट आणि बेकायदेशीर पद्धतींचा अवलंब केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. राणे यांनी मिळवलेल्या विजय हा मत विकत घेऊन आणि मतदारांना धमकी देऊन मिळवला आहे. त्यामुळे त्यांचा हा विजय रद्द करण्यात यावा. तसेच त्यांनी निवडणूक काळात केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी. अशी मागणी याचिकेमध्ये विनायक राऊत यांनी केली आहे.

48 तास आधी प्रचाराला पूर्णविराम दिला जातो पण…

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, मतदानाच्या ४८ तास आधी प्रचाराला पूर्णविराम दिला जातो. तथापि, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ६ मे रोजीही राणे यांचे कार्यकर्ते-समर्थक प्रचार करताना आढळून आल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. तसेच, ही कृती वैधानिक तरतुदीचे उल्लंघन असल्याचेही राऊतांनी याचिकेत म्हटले आहे.

अजित पवारांना बारामतीकरांनी पिळून काढलय; नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार येणार, राऊतांचा विश्वास

तक्रारीकडे लक्ष दिले नाही

या प्रकरणी १६ मे रोजी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. तसेच, राणे यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना धमकावणे आणि लाच देण्यासारख्या भ्रष्ट पद्धतीचा अवलंब करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे सांगितले होते. मात्र, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे, न्यायालयात धाव घेतल्याचे राऊत यांनी याचिकेत म्हटले आहे. राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनीही 13 एप्रिल रोजी जाहीर सभेत मतदारांना धमकावल्याचा आरोपही राऊत यांनी याचिकेत केला आहे.

Maratha Reservation: फडणवीस एकटे पडलेत! निवडणुकांसाठी कागदपत्र तयार ठेवा; जरांगेंनी पेटवलं रान

राऊतांचा पराभव राणेंची बाजी

देशभरात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये 7  मे रोजी निवडणूक पार पडली होती. त्यामध्ये राणे यांना चार लाख 48 हजार 514 मतांनी विजय मिळाला होता. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असलेले विनायक राऊत त्यांचा 47 हजार 858 मतांच्या फरकाने पराभव झाला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube