…तेव्हा कोकणात यांच्यासारखे दलाल फिरत नव्हते; राज यांचा उद्धव ठाकरे, विनायक राऊतांवर निशाणा

…तेव्हा कोकणात यांच्यासारखे दलाल फिरत नव्हते; राज यांचा उद्धव ठाकरे, विनायक राऊतांवर निशाणा

Raj Thackeray Kankavli Sabha: सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे (Naryan Rane) यांच्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कणकवलीत सभा घेतली आहे. या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हे जमिनींचे दलाल असल्याचा उल्लेखही राज ठाकरे यांनी केलाय.


मोठी बातमी : हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला, पाच जवान जखमी

उद्धव ठाकरेंविरोधात बोलताना राज ठाकरे म्हणाले, मोदींच्या चांगल्या निर्णयाचे मी कौतूक केले. तर मला जे पटले नाही, त्यावर मी स्पष्पपणे बोललो आहे. विरोधकांमध्ये अशी बोलायची हिम्मत लागते. माझा हेतूस्पष्ट होता. आताच्या लोकांसारखी नाही, मला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी विरोधात जातो. काही देण्याच्या बदल्यात मला काही घ्यायचे नाहीत. सत्तेचा बोळा तोंडात घातला होता. तेव्हा काही बोलले नाहीत. मुख्यमंत्रिपद हिरावून घेतल्यानंतर आता तुम्ही बोलत आहात.

दोन्ही आजी-माजी उमेदवार गद्दार, त्यांना प्रेशर कुकरचे चटके बसायला लागले; उत्कर्षा रुपवतेंचे टीकास्त्र

2014 ते 2019 मध्ये तुम्ही सत्तेत होतात. त्यानंतर अडीच वर्ष तुम्ही सत्तेत होता. तेव्हा का नाही झाला विकास, असा सवालही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आला. कोकणात उद्योगधंदा आला की यांचा खासदार विरोध करतो. त्याला आमदाराचा पाठिंबा असतो. जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पा आल्यातर कोकणाचा नाश होईल, असे ही सांगतात. परंतु देशात अनेक ठिकाणी अणूऊर्जा प्रकल्प आहे कुठे झाला का स्फोट, असे राज ठाकरे म्हणाले.

हे लोक कोकणात प्रकल्प येऊ देत नाही. नाणार प्रकल्पाला यांचा खासदार विरोध करत होता. नाणारला जेवढी जमिन संपादित केली आहे. तेथे जमीन आली कुठून ? अनेक दलालांनी ही जमिन विकत घेतली. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बारसूला प्रकल्प हलविला आहे. तेथे पाच हजार एकर जमीन असल्याचे सांगितले. यांचाच लोकांनी घेतलेली या जमिनी आहेत. तेथे सरकार जास्त पैसे देतात म्हणून यांनीच कमी किंमतीत जमिनी घेतल्या आहेत. येथील खासदारांचे हे प्रकार सुरू आहेत. कोकण रेल्वे किती वर्षांत झाली. तेव्हा असे दलाल फिरत नव्हते, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube