‘गाडायला आणि वाकायलाही ताकद लागते’,नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रतिहल्ला
Narayan Rane On Uddhav Thackeray : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 3 मे रोजी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेत महायुतीचे (Mahayuti) उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.
नारायण राणे यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मला कोणी तरी धमकी दिली की कोण इथं येतो बघतो, मी येऊन उभा आहे, तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो अशा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना दिला. तर आता उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला नारायण राणे यांनी देखील प्रतिउत्तर दिला आहे.
कणकवलीत महायुतीच्या जाहीर सभेत नारायण राणे म्हणाले, गाडायला ताकद लागते, वाकायलाही ताकद लागते ते तुम्हाला जमत नाही. कोणाला गाडणार नाव घ्या, नाव घेण्यासाठी हिम्मत लागते. असा प्रतिआव्हान राणेंनी ठाकरेंना दिला.
पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, आमच्या बद्दल असं बोलू नका आम्ही बोलणारी माणसे नाही आम्ही कृती करणारे माणसे आहोत असं देखील नारायण राणे म्हणाले. तुम्ही अडीच वर्षात राज्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलं याची माहिती लोकांना द्या, तुम्हाला फक्त शिव्या देता येतात असं देखील नारायण राणे या जाहीर सभेत बोलताना म्हणाले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले होते की, आज सकाळी मला कोणी तरी धमकी दिली की कोण इथं येतो बघतो, मी येऊन उभा आहे, तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो अशा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना दिला होता.
… तर पवारांची औलाद सांगणार नाही, अजित पवारांची भरसभेत मोठी घोषणा
तुला लाज वाटली पाहिजे यापूर्वी देखील इकडे येऊन तुला आडवा केला त्यानंतर माझ्या घराकडे तुला साफ केला, लाज नाही लज्जा नाही फक्त बडबडतो म्हणून म्हणतो शुभ बोल रे नाऱ्या असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला होता.