40 वर्षानंतरही परकं मानतात, मग तळपायाची आग मस्तकात जाणार…; अजित पवार संतापले

40 वर्षानंतरही परकं मानतात, मग तळपायाची आग मस्तकात जाणार…; अजित पवार संतापले

Ajit Pawar On Sharad Pawar : अजित पवारांच्य (Ajit Pawar) वक्तव्याला प्रत्युत्तर देतांना शरद पवारांनी (Sharad Pawar) मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार चांगलेच संतापले. त्यांनी शरद पवारांव जोरदार हल्लाबोल केला.

जाहीर सभेत अजित पवारांकडून द्रौपदीचा उल्लेख, जितेंद्र आव्हाड म्हणाले, ज्या महाराष्ट्रात … 

घरातले पवार आणि बाहेरच पवार वेगळे, असं वक्तव्य केल्यानंतर शरद पवारांवर अजित पवार गटाने टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर पवारांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता अजित पवार शरद पवारांना लक्ष केलं. आज इंदापुरातील एका सभेला संबोधित करतांना अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, 40 वर्ष एखाद्याच्या घरी येऊन ती परकी मानली जाते, याचाही महिलांनी विचार केला पाहिजे. वरिष्ठ तुम्हाला परकं मानत असतील, तर तळपायाची आग मस्तकात जाणार नाही का? असा सवाल अजित पवारांनी केला.

Utkarsha Roopwate Resigned : काँग्रेसला खिंडार! उत्कर्षा रूपवते यांनी दिला पदाचा राजीनामा 

पुढं बोलतांना ते म्हणाले, इतकं करूनही लोक समोरच्या बाजूने आहेत. मी प्रत्येकासाठी केलं. आता माझा परिवार सोडून सगळे फिरत आहेत. काल तर प्रतिभा काकाी देखील प्रचाराला आल्या, नव्वद नंतर त्यांनी कधी प्रचार केला नाही. मी तर डोक्यावर हात मारला, असं अजित पवार म्हणाले.

भावनिक न होता साथ द्या
एवढी कामं करूनही तुम्ही मला यश देणार नसला तर मला वेदना होणार नाहीत का? एवढी कामं दुसऱ्या तालुक्यात केली असती तर मला बिनविरोध निवडून दिले असते. भावनिक न होता मला साथ द्यावी, असं आवाहनही अजित पवारांनी केलं. मी काम करणारा माणूस आहे. विरोधक काहीही बोलू लागले आहेत. मी त्यांना उत्तर देत नाही. अरे मंत्री झाला तर आरोप होतील ना? आमदार झाला तर आरोप होती ना? पण, त्यात काही तथ्य नाही, असं अजित पवार म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
बारामतीच्या प्रचार सभेत अजित पवार म्हणाले की, आजपर्यंत पवार साहेबांना मत दिल. मला आणि सुप्रिया सुळेंना मतदान केलं. आता सूनेला मतदान करायचं, ज्या ठिकाणी पवार हे नाव दिसेल, त्या ठिकाणी मतदान करा, असं ते म्हणाले होते. त्यावर बोलतांना शरद पवार म्हणाले, पवारांनाच मतदान करा हे अजित पवारांचे मत योग्य आहे, पण मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार हे वेगवेगळे आहेत, असे शरद पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज