Utkarsha Roopwate Resigned : काँग्रेसला खिंडार! उत्कर्षा रूपवते यांनी दिला पदाचा राजीनामा

Utkarsha Roopwate Resigned : काँग्रेसला खिंडार! उत्कर्षा रूपवते यांनी दिला पदाचा राजीनामा

Utkarsha Roopwate Resigned : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) कार्यक्रम जाहीर झाला असून प्रचार रंगात असताना शिर्डीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून उत्कर्षा रुपवते (Utkarsha Roopwate ) यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (Maharashtra Congress) महासचिव पदाचा व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. रूपवते यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना पाठविला आहे.

एकनिष्ठ अशा कार्यकर्त्याला पक्ष सोडण्याचा का निर्णय घ्यावा लागतो याबद्दल नेतृत्व आणि विचार करण्याची गरज आहे अशी खंत देखील यावेळी रूपवते यांनी व्यक्त केली आहे. गेली अनेक वर्ष काँग्रेसची एकनिष्ठ अशी रूपवते कुटुंबीयांची ओळख ही होती. महाराष्ट्रात तसेच नगर जिल्ह्यात काँग्रेस वाढीसाठी रूपवते कुटुंबीयांनी मोठी मेहनत देखील घेतली होती.

दरम्यान लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव असल्याने काँग्रेस मधून उत्कर्ष रूपवते या लोकसभेसाठी इच्छुक होत्या. महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेससाठी सोडण्यात यावी अशी त्यांनी वेळोवेळी पक्षश्रेष्ठींकडे मागणी देखील केली होती. मात्र महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी न मिळाल्याने रूपवते या नाराज होत्या. त्यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडियावरून काँग्रेसची पोस्टर तसेच नेत्यांची फोटो देखील हटवली होती. दरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत जाऊन भेट घेतली होती.

लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या रुपवते या बंडाच्या तयारीत होत्या. येत्या काही दिवसांमध्ये आपण आपला निर्णय जाहीर करू अशी सूचक विधान देखील त्यांनी केले होते. अखेर नाराज असलेल्या रूपवते यांनी आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठवला आहे.

पत्रात नेमकं काय म्हटले

मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदाचा व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. आजवर पक्षाने ज्या विविध पदावरून वरती काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानते. गेल्या सोळा वर्षांपासून पक्षाची प्रामाणिकतेने काम केली. पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडली.

कोरोनातील कामाचे व्हिडिओतून राजकारण करणारे आम्ही नाही… विखेंचा लंकेंना टोला

रूपवते चौधरी कुटुंबातील तिसरी पिढी काँग्रेस पक्षात कार्यरत असताना निस्वार्थपणे अहोरात्र पक्षासाठी झटणाऱ्या माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतो याबद्दल पक्ष नेतृत्व आणि विचार करण्याची गरज आहे अशी खंत देखील यावेळी रूपवते यांनी व्यक्त केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube