शिर्डीत वाकचौरेंचे टेन्शन वाढणार! उत्कर्षा रुपवतेंनी घेतली आंबेडकरांची भेट, वंचितकडून लढणार?

शिर्डीत वाकचौरेंचे टेन्शन वाढणार! उत्कर्षा रुपवतेंनी घेतली आंबेडकरांची भेट, वंचितकडून लढणार?

Utkarsha Rupawate Meet Prakash Ambedkar : सध्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections) वारे वाहत असून सर्वच पक्षांकडून आपापले उमदेवारी जाहीर केले जात आहेत. शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha)मतदारसंघातून ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौर यांना उमदेवारी दिली आहे. तर शिंदे गटाने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, शिर्डीतून लढण्यसााठी उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupawate) इच्छूक होत्या. मात्र, मविआत हा मतदासंघ ठाकरे गटाकडे गेल्यानं रूपवतेंनी आता बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) याची भेट घेतली.

तुम्हाला निवडणुकीत ज्याला पाडायचे, त्याला पाडा; मनोज जरांगेंची लोकसभा निवडणुकीतून माघार 

ठाकरे गटाने दोन दिवसांपूर्वी आपल्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. ठाकरे गटाने राज्यातील 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमदेवारी जाहीर केली. वाकचौरे यांच्या उमेदवारीला शिवसेनेसह मविआतून जोरदार विरोध होऊ लागला. वाकचौरे यांच्याविरोधात शिवसेनेचे समन्वयक अशोक गायकवाडांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तर आता काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते यांनीही बंडाचे हत्यार उपसले आहे.

मोठी बातमी : ‘तुतारी’ हाती घेताच निलेश लंकेंना नगरमधून उमेदवारी; पवार गटाची पहिली यादी जाहीर 

शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला होता. मात्र, महाविकास आघाडीत हा मतदासंघ ठाकरे गटाकडे गेल्यानं उत्कर्षा रूपवते उमेदवारीपासून ‘वंचित’ राहिल्या.

2009 पासून या मतदारसंघात त्याच त्याच चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. चळवळीत इतर कार्यकर्त्यांनाही संधी मिळावी, अशी विनंती रुपवते यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडे केली होती. मात्र शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी जाहीर होताच उत्कर्षा रुपवते यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे छायाचित्र हटवले. तसेच काँग्रेसचे चिन्हही काढून टाकले होते. त्यानंतर आता त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर याची भेट घेतली. त्यामुळं रुपवते आगामी निवडणूक वंचित यांच्या तिकिटावर लढवणार असल्याची चर्चा परिसरात आहे.

उत्कर्षा रूपवते गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघात वाकचौरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानं रुपवतेंनी वंचितकडून निवडणूक लढली तर वाकचौरे यांची डोकेदुखी आहेत. कारण, मतविभागणीचा फटका त्यांना बसणार आहे. त्यामुळं उत्कर्षा रुपवते यांचे बंड थंड करण्यात महाविकास आघाडी यशस्वी होणार का? की रुपवते वंचितच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार, हे पाहणे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube