सरकार निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू देत नाही, एवढी कसली भीती आहे?, खर्गेंचा संतप्त सवाल

सरकार निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू देत नाही, एवढी कसली भीती आहे?, खर्गेंचा संतप्त सवाल

Mallikarjun Kharge :  व्होट चोरीच्या (Vote Chori) विरोधात इंडिया आघाडाीच्या (India Alliance) खासदारांनी सोमवारी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या (Election Commission) मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. हा मोर्चा अडवत पोलिसांनी राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधी (Priyanka Gandhi), अखिलेश यादव (Akhilesh Yadav), संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना ताब्यात घेतले. यावरून कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी सरकारला संतप्त सवाल केलाय.

खंडणीखोरांचा सरदार कोण? जनता जाणते! बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका 

जर सरकार आम्हाला निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू देत नसेल, तर त्यांना कशाची भीती आहे हे आम्हाला समजत नाही?, असं ते म्हणाले.

निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. या मोर्चात विरोधी पक्षांचे सर्वच खासदार सहभागी झाले होते. मात्र, हा मोर्चा अडवत पोलिसांनी विरोधी खासदारांना ताब्यात घेतले. याबाबत बोलताना खर्गे म्हणाले, या मोर्चात सर्व खासदार उपस्थित होते, आम्ही शांततेत मोर्चा काढत होतो. निवडणूक आयोगाने सर्व खासदारांना बोलावावे, बैठक घेऊन आमचे विचार ऐकावेत, अशी आमची इच्छा होती. परंतु निवडणूक आयोग म्हणत आहे की फक्त ३० सदस्यांनी यावे. हे कसे शक्य आहे? जर सरकार आम्हाला निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू देत नसेल, तर त्यांना कशाची भीती आहे हे आम्हाला समजत नाही?, असं खर्गे म्हणाले.

खासदार लंकेंच्या बालेकिल्ल्यात सुजय विखेंची बाजी! पारनेर दूध संघाची निवडणूक जिंकली 

मोर्चा पोलिसांकडून रोखण्यात आला त्यावेळी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव बॅरिकेड्सवरून उडी मारून आत आले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर राहुल गांधींनी पोलिसांच्या बसमधून गर्जना करत आमचा लढा सुरूच राहील, हा लढा राजकीय नाही, तर संविधान वाचवण्यासाठी आहे, असं ते म्हणाले.

सरकार डरपोक – प्रियांका गांधी

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रियांका गांधींनी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. हे सरकार डरपोक असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. व्होट चोर, गद्दी छोडो, अशी घोषणा त्यांनी दिल्या. प्रियांका गांधी म्हणाल्या की, हे सरकार घाबरलं आहे. सरकार डरपोक आहे, असं त्या म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube