इव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? निवडणूक आयोगाच्या खुलाशाने अनेकांना तोंडावर आपटले

इव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? निवडणूक आयोगाच्या खुलाशाने अनेकांना तोंडावर आपटले

State Election Commission Press conference : ईव्हीएम हॅक होत नाही आणि होऊ शकत नाही. तसंच, त्याला कुठल्याही प्रकारे ब्ल्युट्यूथ किंवा इतर केबल कनेक्शन नाही त्यामुळे त्यावरून संशय घेण चूक आहे असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाकतील टर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांनी दिलं आहे. तसंच, डेटा इंन्ट्रीचा पासवर्ड येतो त्याच्याशी मशिनचा काही संबंध नाही. (SEC) तेथे कोणतीही रिपीट मतमोजणी झाली नाही असंही या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.

मतमोजणी पुन्हा केली नाही   वायकरांच्या मेहुण्याकडील फोन ईव्हीएमशी जोडलेला; निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट

किर्तीकर हे 26 व्या राऊंडमध्ये ईव्हीएम मशिनमध्ये 1 मतांनी आघाडीवर होते. तर त्याचवेळी 25 आणि 26 राऊंडच्या मध्ये पोस्टल मतमोजणी झाली. त्यामध्ये 49 मतांनी वायकर आघाडीवर होते. तसंच, यामध्ये कोणत्याही बाजूने पुन्हा मतमोजणीची मागणी झाली नाही. बाद मतदान झाले त्याची पुन्हा मोजणी केली. मतमोजणी पुन्हा केली नाही. त्यामुळे त्यावर संशय घेण्याची आवश्यकता नाही असंही निवडणूक अधिकारी म्हणाल्या आहेत.

गुन्हा दाखल करण्यात आला

वृत्तपत्रात दावा करण्यात आला आहे की, शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना त्यांच्या नातेवाईकांनी मोबाईलचा वापर करून 48 मतांच्या फरकाने विजय मिळवून दिला आहे. ४ जून रोजी मतमोजणीच्या वेळी हा फोन ईव्हीएमशी कनेक्ट होता. वायकर यांचे मेहुणे मंगेश पांडिलकर यांच्यावर बुधवारी 4 जून रोजी, मतमोजणी केंद्रावर मोबाईल फोन वापरल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी दिली.

बातम्या पूर्णपणे चुकीच्या   Rahul Gandhi: ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्स; राहुल गांधींचं ट्वीट, वायकरांच्या बातमीचं जोडलं कात्रण

याबाबत येत असलेल्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत, आम्ही अशा बातम्या छापणाऱ्या वृत्तपत्रांना नोटीसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर मानहानीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. वनराई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, वायकर यांच्या मतदारसंघाचा भाग असलेल्या गोरेगाव येथील मतमोजणी केंद्रात पांडलीकर यांनी केलेल्या कथित कृत्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे..

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज