पृथ्वीराज चव्हाण हे चांगले नेते; विचार करून त्यांनी स्वतःला त्रास करून घेऊ नये; मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला

पृथ्वीराज चव्हाण हे चांगले नेते. असे विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नये. त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी - मुख्यमंत्री फडणवीस

  • Written By: Published:
Untitled Design (112)

CM Fadnavis’ valuable advice to Prithviraj Chavan : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) हे पुणे दौऱ्यावर होते. याच वेळी राज्य निवडणूक आयोगाने(State Election Commision) महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत निवडणुकीसह इतर मुद्द्यांवर देखील भाष्य केलं. काँग्रेसचे(Congress) ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण(Pruthviraj Chavan) यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. की, 19 डिसेंबरला देशाच्या पंतप्रधानपदी(Prime Minister) एक मराठी माणूस असेल. त्याचप्रमाणे ट्रम्प(Donald Trumph) यांचा हवाला देत अमेरिकेत(America) घडणाऱ्या घडामोडींवर देखील भाष्य केलं होतं. त्यानंतर विरोधीपक्षाने देखील त्यांच्या या वक्तव्याला दुजोरा दिला होता.

मात्र मुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी राज्यातील बऱ्याच नेत्यांना आतापर्यंत साक्षात्कार होत होते. भविष्यवाणी ते करत होते. हे आम्ही बघितलेलं आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण सारखा ज्येष्ठ नेता, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, पीएमओचे मंत्री राहिले त्यांना देखील असे साक्षात्कार व्हायला लागले. तर त्यात नक्कीच काही काळ बेर असेल. पृथ्वीराज चव्हाण हे चांगले नेते आहेत. असे विचार करून त्यांनी स्वतःला त्रास करून घेऊ नये. त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे.

महापालिका निवडणुकांची घोषणा! दुबार मतदार अन् चुकीचा पत्ता, निवडणूक आयोगाने काय दिलं स्पष्टीकरण?

राज्यातील महापालिकेत महायुती कशी असेल याबाबत त्यांना विचारलं असता, आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लढणार असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत लढणार नाही हे देखील स्पष्ट केलं आहे. या दोन्ही महापालिकेत आम्ही सोबत लढलो तर तिसऱ्याच फायदा होऊ शकतो, आम्ही एवढे वेडे नाहीत की, यातून तिसऱ्याच फायदा होऊन देऊ. त्यामुळे आम्ही वेगवेगळे लढू. मात्र या लढती मैत्रीपूर्ण होतील. हे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

follow us