वर्ष संपताना अमृताचं प्रेक्षकांना अजून एक सरप्राईज! तस्करीमध्ये इम्रान हाश्मीसोबत झळकणार

Amrita Khanvilkar ने तिच्या चाहत्यांना 2025 हे वर्ष संपत असताना अनेक खास सरप्राईज दिले. नेटफ्लिक्सच्या वेब सीरिजमध्ये ती मुख्य भूमिकेत झळणार

Amrita Khanvilkar

Amrita Khanvilkar has another surprise for the audience as the year ends! She will be seen opposite Emraan Hashmi in Taskari : 2025 हे वर्ष संपत असताना अमृताने तिच्या चाहत्यांना अनेक खास सरप्राईज दिले . एकीकडे नव्या वर्षात अमृता रंगभूमीवर पदार्पण करणार असून वर्ष संपत असताना नेटफ्लिक्स वरच्या एका नव्या कोऱ्या वेब सीरिज मध्ये ती मुख्य भूमिकेत झळकताना दिसणार आहे.

नॅशनल क्रश गिरीजासह कोपरगावात धडकणार कॉमेडिची बुलेट ट्रेन; महाराष्ट्राचा हास्यविनोद व संगीत कार्यक्रमाचे आयोजन

नेटफ्लिक्सवर येणाऱ्यातस्करीया वेब सीरिज मध्ये तिची विशेष लक्ष वेधून घेणारी भूमिका बघायला मिळणार असल्याचं कळतंय. तिच्या सोबतीने अनेक बॉलिवूडचे बडे कलाकार देखील तस्करी मध्ये काम करताना दिसणार आहेत. ” तस्करीमध्ये पहिल्यांदा अमृता आणि बॉलिवुड अभिनेता इम्रान हाश्मी यांची जोडी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

विरोधकांकडून समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला मारहाण; कोल्हे यांचं नाव न घेता संदीप कोयटे यांची अप्रत्यक्ष टीका

अमृताने सोशल मीडियातस्करीचा टीझर शेयर केला असून तिच्या कॅप्शन ने लक्षवेधून घेतलं आहे. तस्करीच्या दुनियेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे असं म्हणत तिने हा टिझर सोशल मीडिया वर पोस्ट केला आहे. इम्रान सोबत तिची काय भूमिका साकारणार? या तस्करीच्या विश्वात अमृताचा काय रोल असणार हे बघण्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे.

भाजप अन् शिंदेंकडून मुंबईसाठी खोट्या घोषणा; पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंकडून चिरफाड

वर्षभर नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्स मधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अमृता वर्ष संपताना देखील त्यांचं निखळ मनोरंजन करणार यात शंका नाही ! तर येणाऱ्या वर्षात प्रेक्षक तिला रंगभूमीवर बघण्यासाठी देखील तितकेच उत्सुक असल्याचं बघायला मिळतंय.

follow us