वायकरांच्या मेहुण्याकडील फोन ईव्हीएमशी जोडलेला; निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट
Ravindra Waikar vs Amol Kirtikar : लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निवडणूक (Lok Sabha Election) चांगलीच गाजली होती. या निवडणुकीत शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांनी ठाकरे (Ravindra Waikar) गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा फक्त 48 मतांच्या (Amol Kirtikar) फरकाने पराभव केला होता. इतक्या कमी मतांनी पराभव झाल्याने हा निकाल ठाकरे गटाने अजूनही स्वीकारलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंतची लढाई (Supreme Court) लढण्याची तयारी ठाकरे गटाची आहे. अशा घडामोडी घडत असतानाच आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. वायकरांच्या मेहुण्याने मतमोजणी केंद्रात वापरलेला फोन ईव्हीएम मशीनशी जोडलेला होता अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.
निवडणुकीतील मतमोजणीबाबत अमोल किर्तीकर यांनी आक्षेप घेतला होता. पुढे त्यांनी रवींद्र वायकरांचे नातेवाईक आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटरविरोधात वनराई पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामुळे पुन्हा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे.
शिंदेंची गुलामी करणाऱ्या सूर्यवंशी भ्रष्ट अधिकारी; वायकरांच्या बाजूने निकाल दिल्याने राऊत भडकले
मतमोजणीच्या दिवशी रवींद्र वायकर यांचे मेहुणे विना परवानगी मोबाइलचा वापर करताना आढळून आले होते. वायकर यांचे मेहुणे ज्या फोनचा वापर करत होते तो फोन ईव्हीएम मशीनबरोबर जोडला होता असे आढळून आले आहे. पोल पोर्टल ऑपरेटरने वायकरांचे मेहुणे यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरण्यासाठी दिल्याचा आरोप होत आहे. हा तोच फोन होा जो ईव्हीएम मशीनशी जोडलेला होता. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर आता ठाकरे गट आणि महायुती यांच्यातील वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसून लागली आहेत.
मतमोजणीच्या दिवशी रवींद्र वायकर यांचे मेहुणे मतमोजणी केंद्रात मोबाइल फोन वापरत होते असा आरोप करण्यात आल होता. हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी या प्रकाराची तक्रार पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. पोलिसांनी मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. तर तहसीलदारांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. या एफआयआरची प्रत देण्यासही पोलिसांनी नकार दिल्याचा आरोप भरत शाह यांनी केला होता.
‘शहांचा राज्यपालपदाचा शब्द, दरेकरांनी विनाकारण बोलू नये’ किर्तीकरांसाठी अडसूळ मैदानात