‘फेअर प्ले’ प्रकरणी मुंबई, पुण्यात ईडीची छापेमारी; कोट्यवधींचे साहित्य जप्त, परदेशात कसे गेले पैसे ?

  • Written By: Published:
‘फेअर प्ले’ प्रकरणी मुंबई, पुण्यात ईडीची छापेमारी; कोट्यवधींचे साहित्य जप्त, परदेशात कसे गेले पैसे ?

ED Mumbai conducted search operation about fair play betting: क्रिकेटचे सामने, लोकसभा निवडणुकी ( Loksabha Election) दरम्यान फेअर प्ले अॅपचा बेटिंगसाठी (सट्टा) वापर केल्याचे ईडीच्या (ED) कारवाईत उघडकीस आले आहे. इडी पथकाने मुंबई आणि पुण्यातील 19 ठिकाणी बुधवारी छापेमारी केली होती. त्यात ईडीने सुमारे आठ कोटी रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.

आमदार अन् नेते सोडून जाण्याच्या भीतीने सुनेत्रा पवारांना खासदारकी; रोहित पवारांचा दावा

 

मुंबई आणि पुण्यात ईडीने फेअर प्ले अॅप प्रकरणी शोध मोहिम राबविली आहे. फेअर प्ले अॅपद्वारे क्रिकेट, आयपीएल सामन्यांचे बेकायदेशीर प्रसारण, लोकसभा निवडणुकीदरम्यान अॅपचे सट्टा लावण्यासाठी वापर केल्याचे समोर आहे. ईडीने छापेमारीत, रोकड, बँकेतील फंड, डीमॅट खातांसह, लक्झरी घड्याळ , डिजिटल साहित्य असे असे आठ कोटींची मालमत्ता जप्त केली असल्याची माहिती इडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली. या प्रकरणात आणखी काही जणांची चौकशी सुरू असल्याची माहिती ईडीकडून जाहीर करण्यात आली.

मोठी बातमीः पोस्को प्रकरणात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट !


वायकॉम 18 ला शंभर कोटींचा फटका

अंबानींच्या मालकीची कंपनी वायकॉम 18 मीडिया कंपनीने मुंबईत सायबर पोलिस स्टेशनला एक गुन्हा नोंदविला होता. कॉपिराइट अॅक्टनुसार फेअर प्ले स्पोर्ट्स एलएलसी विरोधात ही तक्रार होती. या कंपनीने आयपीएलचे सामने दाखविल्यामुळे वायकॉम कंपनीच्या उत्पन्नाला तब्बल शंभर कोटी रुपयांचा फटका बसला होता. फेअर प्लेने दुबई आणि कुराकाओ परदेशी कंपन्यांद्वारे सेलिब्रिटींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय एजन्सींसोबत करार केल्याचे उघडकीस आले.

बोगस आणि बेनामी खात्यांमध्ये पैसे

फेअर प्लेने गोळा केलेले पैसे हे अनेक बोगस आणि बेनामी बँक खात्यांमधून घेण्यात आल्याचे ईडीचे तपासात समोर आले. शेल (फक्त कागदावर असलेल्या) कंपन्यांच्या कॉम्प्लेक्स वेब ऑफ बँक अकाउंटचा वापर करण्यात आला. तसेच फार्मा कंपन्यांच्या वापर करून बोगस बिले तयार करण्यात आली.

बेनामी कंपन्यांच्या चारशेहून अधिक खात्यांचा वापर

हाँगकाँग, चीन, दुबई येथील बेनामी कंपन्यांचा वापर पैसे पाठविण्यासाठी करण्यात आला. त्यासाठी चारशेहून अधिक खात्यांचा वापरही करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज