मोठी बातमीः पोस्को प्रकरणात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट !

  • Written By: Published:
मोठी बातमीः पोस्को प्रकरणात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट !

Bengaluru court issues non-bailable arrest warrant against former CM B S Yediyurappa in POCSO case: पोस्कोच्या गुन्ह्यात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भाजप नेते (bjp) बी. एस, येडियुरप्पा (B S Yediyurappa) यांच्या संकटात वाढ झाली आहे. पोस्को प्रकरणात बेंगळुरू न्यायालयाने येडियुरप्पा यांना अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते आहे. या प्रकरणात युडियुरप्पा यांची कालच सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. तर कर्नाटकचे गृहमंत्री यांनी त्यांना अटक होऊ शकते, असे विधानही केले होते.


मोठी बातमी : फिर एक बार अजित डोवाल; NSA पदावर तिसऱ्यांदा डोवाल यांची नियुक्ती

17 वर्षांच्या मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर युडियुरप्पा यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. पोस्को अ‍ॅक्ट आणि विनयभंग असा गुन्हा दाखल आहे. फेब्रुवारी महिन्यात येडियुरप्पा यांच्या घरी पीडित मुलगी गेली होती. त्यावेळी युडियुरप्पा यांनी तिचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर पीडित मुलीची 54 वर्षीय आई हिचा खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. फुफसाच्या कर्करोगामुळे या महिलेचा मृत्यू झाला होता. तर 81 वर्षी येडियुरप्पा यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तर कायदेशीर लढाई लढू, असे येडियुरप्पा यांनी माध्यमांसमोर जाहीर केलेले आहे.


Maharashtra Politics : महाराष्ट्राचा ‘सरताज’ सांभाळाचाय; खुद्द पवारांनी सांगितला पुढचा प्लॅन

या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडून करण्यात येत आहे. तसेच येडियुरप्पा यांच्याविरुद्ध येत्या दोन दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे वृत्त आहे. याबाबत कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले, सीआयडी या प्रकरणाचा तपास करत आहेत. चौकशीसाठी सीआयडीसमोर हजर राहण्यास त्यांना सांगितले आहे. गरज असल्यास त्यांनी अटकही केली जाईल.

पण येडियुरप्पा हे सीआयडीसमोर हजर झाले नाहीत. येडियुरप्पा यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिन याचिका दाखल केली होती. परंतु त्यापूर्वीच बेंगळुरू न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube