Sujay Vikhe यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी मैदानात; अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना

Sujay Vikhe यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी मैदानात; अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना

Sujay Vikhe : निवडणुकीचे बिगुल वाजले असून त्या दृष्टीने आता नगर जिल्ह्यात देखील हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांच्या विजयासाठी आता खुद्द अजित पवार यांची राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे. महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर शहरांमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अजित पवार यांच्या आदेशानुसार हा मेळावा आयोजित करण्यात आले असल्याने यामुळे अजित दादा विखेंच्या विजयासाठी सरसवल्याने लंकेची डोकेदुखी वाढणार हे मात्र नक्की.

‘नरेंद्र मोदींना 28 पैशांचा पंतप्रधान म्हणायला हवं’; उदयनिधी स्टालिन यांचे वादग्रस्त वक्तव्य

नगर शहरात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण जिल्हा राष्ट्रवादी पक्षाची बैठक नवनियुक्त जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारा संदर्भात प्राथमिक चर्चा झाली तसेच प्रचाराचे नियोजन मतदार संघातील बैठका यांबाबत नियोजन केले. 4 एप्रिलला शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सव, मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महायुतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल तसेच उपमुख्यमंत्री व पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना आखली जाईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर दक्षिण लोकसभा महायुतीचे समन्वयक म्हणून आमदार संग्राम जगताप व दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून बाळासाहेब नाहटा यांची नियुक्ती केल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

CM शिंदेंचे आमदार शहाजीबापूंना धक्का! पुतणे संग्राम पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर..

यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा म्हणाले की, महायुतीचे समन्वयक आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचाराचे नियोजन तसेच मतदारसंघातील पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बैठकांचे नियोजन केले आहे. येत्या 4 एप्रिल रोजी शहरात पक्षाचे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. तसेच या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विचार पोहोचवण्याचे काम करणार असून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे काम करू असे ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्यने पदाधिकारी उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज