‘नरेंद्र मोदींना 28 पैशांचा पंतप्रधान म्हणायला हवं’; उदयनिधी स्टालिन यांचे वादग्रस्त वक्तव्य

‘नरेंद्र मोदींना 28 पैशांचा पंतप्रधान म्हणायला हवं’; उदयनिधी स्टालिन यांचे वादग्रस्त वक्तव्य

Udhayanidhi Stalin : वादग्रस्त वक्तव्य करून सातत्याने अडचणीत येणार तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टालिन यांचे पुत्र उदयनिधी स्टालिन पु्न्हा (Udhayanidhi Stalin) चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त  (PM Narendra Modi) वक्तव्य केले आहे. भाजपाच्या नेतृत्वातील सरकार असमान प्रमाणात निधीचे वाटप करत आहे. राज्यांकडून जर कराच्या स्वरुपात एक रुपया महसूल केंद्र सरकारला जात असेल तर त्यातील फक्त 28 पैसे परत मिळतात, असा आरोप उदयनिधी स्टालिन यांनी केला. राज्यातील रामनाथपूरम आणि थेनी येथील रॅलीत बोलताना स्टालिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणावरही टीका केली. केंद्राचे शिक्षण धोरण राज्यातील मुलांचे भविष्य उद्धवस्त करील.

Sanatan Dharma : ‘सनातन’ वादाची ‘सुप्रीम’ दखल; उदयनिधींना धाडली नोटीस

तामिळनाडूतील मुलांचे भविष्य उद्धवस्त करण्यासाठीच केंद्र सरकारने नवीन शिक्षण धोरण आणले आहे. केंद्र सरकारने निधी वितरण, विकासकामे आणि राज्यात नीट (NEET) वर प्रतिबंधा प्रकरणीत तामिळनाडूशी भेदभाव केला असा आरोप स्टालिन यांनी केला. यासाठी स्टालिन यांनी मदुराई एम्सचे उदाहरण दिले. भूमिपूजन केल्यानंतर या प्रकल्पाची एकही वीट रचण्यात आली नाही, असेही स्टालिन म्हणाले.

ज्यावेळी तामिळनाडूत निवडणुका असतात तेव्हाच पंतप्रधानांचे पाय तामिळनाडूला लागतात. बाकीच्या वेळी तर पंतप्रधान मोदी तामिळनाडूकडे पाहतही नाहीत, अशीही टीका उदयनिधी स्टालिन यांनी केली. तामिळनाडूत लोकसभेच्या एकूण 39 जागा आहेत. 19 एप्रिल या एकाच टप्प्यात येथे मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने सध्या दक्षिण भारतावर लक्ष केंद्रीत केले आहे.

सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य 

दरम्यान, सनातन हे संस्कृत नाव आहे. तर सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या संपवल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. ते नष्टच करुन टाकायचे आहे. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी तामिळनाडूतील एका कार्यक्रमात केले होते. या वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. ठिकठिकाणी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यानंतरही स्टॅलिन यांनी मात्र आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube