Loksabha Election : महाविकास आघाडीकडून लढणार का ? संभाजीराजेंचे थेट उत्तर

  • Written By: Published:
Loksabha Election : महाविकास आघाडीकडून लढणार का ? संभाजीराजेंचे थेट उत्तर

Sambhaji Raje on Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचा वारसा असलेले कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपतींना (Sambhaji Raje Chhatrapati) मविआत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. संभाजीराजे हे महाविकास आघाडीत सहभागी झाल्यास त्यांना लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) उमेदवारी मिळेल, अशा बातम्या आज प्रसारित झाल्या. दरम्यान, यावर आता खुद्द संभाजीराजेंनी भाष्य केलं आहे. स्वराज्य पक्ष (Swarajya Party) असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही, असं ते म्हणाले.

‘दक्षिण भारत वेगळा देश जाहीर करा’; अर्थसंकल्पानंतर काँग्रेस खासदाराची अजब मागणी 

कोल्हापूर लोकसभेसाठी संभाजीराजेंचं नाव चर्चेत आहे. स्वराज्य संघटनेकडून स्वबळावर किंवा स्वराज्य संघटना आणि महाविकास आघाडीच्या मदतीने ते लोकसभा लढवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांची काँग्रेससोबतही बोलणी सुरू असल्याचं सांगितल्या जातं होतं. अशातच संभाजीराजेंना सोबत घेण्याबाबत मविआतील घटक पक्षांमध्ये एकमत झाल्याचे वृत्त आज प्रकाशित झाले. संभाजीराजे हे महाविकास आघाडीत सहभागी झाल्यास त्यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल, पण संभाजीराजेंना महाविकास आघाडीतील तीन प्रमुख घटक पक्षांपैकी एकात सामील व्हावे लागणार असल्याची अट घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

दरम्यान, छत्रपती संभाजीराजे हे कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून, त्यांनी स्वत: स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच ते आगामी लोकसभा निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणार, मंत्रीमंडळात येणार प्रस्ताव 

याबाबत संभाजीराजेंनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात ते म्हणाले की, स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल. या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे, असं ट्विट त्यांनी संभाजीराजेंनी केलं आहे.

दरम्यान, संभाजीराजे जरी स्वराज्य पक्षातच राहणार असले तरी, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून स्वराज्य पक्ष मात्र महाविकास आघाडीचा घटक होऊ शकतो, हे त्यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळं संभाजीराजे हे स्वराज्य संघटना आणि महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने लोकसभा निवडणूक लढवू शकतात.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज