शिर्डी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांबाबत खासदार लोखंडेंचे मोठे विधान, ‘आठवले असो वा आंबेडकर…’
अहमदनगर – आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) अनुषंगाने राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यातच शिर्डी लोकसभेसाठी (Shirdi for Lok Sabha) अनेक इच्छुकांची नावे समोर आली आहे. यावर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी मोठे भाष्य केलं आहे. लोकशाहीत सर्वच पक्षांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यांनी ती लढावी, यात गैर काहीच नाही, असं खासदार लोखंडे म्हणाले.
महायुतीच्या मेळाव्यात अजितदादांचा शिलेदारच गायब; आ. लंकेंच्या मनात तरी काय?
राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये आज एकाच दिवशी महायुतीचे मेळावे होत आहे. नगर शहरात महायुतीच्या होणाऱ्या मेळाव्यात खासदार सदाशिव लोखंडे बोलत होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीतील इच्छुकांवर भाष्य केले
Shriya Pilgaonkar : काळ्या ड्रेसमध्ये श्रिया पिळगावकरचं फोटोशूट, चाहते फिदा
शिर्डी मतदारसंघातून आरपीआय गटाकडून रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, रामदास आठवले यांनी यापूर्वी 2009 मध्ये शिर्डी लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळेस त्यांचा भाऊसाहेब वाकचौरे यांनी दारून पराभव केला होता. यावेळेस महाविकास आघाडी असल्यामुळे ही जागा आठवलेंनी लढावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, यावर बोलताना शिवसेनेचे खासदार लोखंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि ते निवडणूक लढू शकतात असे ते म्हणाले, अशी मागणी करण्यात काही गैर नाही असेही लोखंडे म्हणाले.
शिर्डी मतदारसंघ एससीसाठी राखीव आहे. काही दिवसांपूर्वी आठवलेंनी माझी पुन्हा शिर्डीतून लढण्याची इच्छा आहे, असं वक्तव्य केलं जातं. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सध्या केंद्रात भाजप आणि आठवले गटाती युती आहे. तर राज्यात भाजप आणि शिंदे गटाची युती असून लोखंडे हे युतीचे विद्यमान खासदार आहेत. अशातच आठवलेंनी केलेल्या वक्तव्यामुळं आणि आठवलेंच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या मागमीमुळं लोखंडेंचं टेन्शन वाढलं आहे. आठवलेंची शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. तर भाऊसाहेब वाकचौरे यांनीही ठाकरे गटात घरवापसी केल्यान शिर्डीतून त्यांची उमेदवारी निश्चित मानले जाते. त्यामुळं विद्यमा खासदार लोखंडे कात्रीत सापडले आहेत. त्यामुळं भाजप शिर्डीची जागा शिंदे गटासाठी राखीव ठेवते की, आठवलेंचं शिर्डीतीतून पत्तं कट करते, हेच पाहणं महत्वाचं आहे.