आमदारकीची हॅट्रिक झाली आता खासदारकीची हॅट्रिक; लोखंडेंना श्रीकांत शिंदेंकडून पाठबळ
अहमदनगर – गेली 33 वर्षे राजकारणात असलेल्या खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी तीनवेळा आमदारकीची हॅट्रिक केली. लोखंडे यांच्या माध्यमातून शिर्डी लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत. याचबरोबर गेली पंचवीस वर्ष रखडून असलेला निळवंडे धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये सदाशिवराव लोखंडे यांची महत्त्वाची भूमिका होती. येत्या काळात लोकसभा निवडणुका असून खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी लोखंडे यांची हमी घेतल्याने ते आता खासदारकीमध्ये देखील हॅट्रिक करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी व्यक्त केला.
अयोध्या कोणाच्या बापाचा नाही; जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर हल्लाबोल
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा, तसेच मुख्यमंत्री वयोश्री व नारीशक्ती योजनांचे लोकार्पण श्रीरामपूर येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, ह.भ.प. रामगिरीजी महाराज, खा. श्रीकांत शिंदे, खा. डॉ. सुजय विखे, आ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, चंद्रशेखर कदम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, ज्ञानेश्वर काळे, ऋग्वेद गंधे उपस्थित होते.
कुख्यात गुंड मोहोळची हत्या कुणी केली ? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट तपासाची दिशाच सांगितली !
यावेळी बोलताना खासदार शिंदे म्हणाले, शिर्डी मतदार संघासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव निधीची तरतूद केली आहे. यामुळे अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. याच बरोबर राज्य शासनाच्यावतीने ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, निर्णय याबाबतही यावेळी माहिती दिली. यावेळी सदाशिवराव लोखंडे यांच्या पुढाकाराने श्रीरामपूर येथे उभारण्यात आलेल्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या पन्नास वर्षांपासून रखडलेल्या निळवंडेचा प्रश्न खासदार लोखंडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे व सर्वांच्या सहकार्याने निकाली निघाला. यामुळे लाखो लोकांना फायदा झाला. लोकांना पिण्याचे तसेच शेतीचे पाणी मिळाले. सर्वांबरोबर जुळून घेतले तर त्याला विरोधक राहत नाही. दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा स्वत: आपले काम करत राहिल्याचा फायदा लोखंडे यांना झाला आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली या मतदार संघात 300 ते 400 कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचे देखील यावेळी शिंदे म्हणाले.