कुख्यात गुंड मोहोळची हत्या कुणी केली ? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट तपासाची दिशाच सांगितली !

कुख्यात गुंड मोहोळची हत्या कुणी केली ? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट तपासाची दिशाच सांगितली !

Devendra Fadnavis : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याच्यावर आज (दि. ५ जानेवारी) दिवसाढवळ्या कोथरुडमधये पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या. या घरालगतच्या परिसरातच मोहोळ याच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अज्ञातांनी दुचाकीरवर येत चार राऊंड फायर करत गोळीबार केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गोळीबारानंतर मोहोळ याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, यावर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं.

Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळचा ‘गेम’ करणाऱ्या एका आरोपीचे नाव अन् फोटो आला समोर 

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी शरद मोहोळच्या हत्येसंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर बोलतांना फडणवीस म्हणाले की, शरद मोहोळ हत्या कांडाने पुण्यात कुठलंही गॅंगवार होणार नाही. कुख्यात गुंडाची हत्याच त्याच्याच साथीदारांनी केली आहे. कुख्यात गॅंग कोणीही गॅंगवार करण्याची हिंमत करणार नाही. गुंडाचा पोलीस खातंबंदोबस्त करेल, असंही फडणवीस म्हणाले.

‘रामजन्मभूमीच्या संघर्षांच्या वेळी काही लोक शेपट्या घालून…’; फडणवीसांची ठाकरेंवर बोचरी टीका 

आज रोहित पवार यांच्यावर बारामती अॅग्रोवर ईडीने छापे टाकले. ही कारवाई सुडभावनेने केल्याचं बोलल्या जातं आहे. त्यावरही फडणवीसांनी भाष्य केलं. रोहित पवारांवर झालेल्या ईडीच्या कारवाईला भापजने सुड भावनेनं कारवाई केली, या कारवाईचा भाजपशी संबंध जोडणं हे विनाकारण शहीद होण्याचे प्रयत्न आहेत. रोहित पवार व्यवसाय करतात. जर त्यांच्या व्यवहारात गैरप्रकार नसेल तर त्यांना घाबरण्याची गरज नाही, असं फडणवीस म्हणाले.

मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला. आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मात्र, गँगस्टर शरद मोहोळची हत्या कुणी केली. हा हल्ला एखाद्या टोळीने अथवा पूर्व वैमनस्यातून झाला का? याविषयी अनेक अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान, शरद मोहोळ याच्यावरील हल्ल्याप्रकरणी दोघांची नावे समोर येत आहेत. शरद मोहोळसोबत उपस्थित असलेल्या साहिल उर्फ ​​मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांचा नेमका रोल काय आहे, याबाबत अजून काहीही स्पष्टता होऊ शकली नाही. पण, शऱद मोहोळची हत्या त्याच्या गुन्हेगारी वैमनस्यातून झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube