अयोध्या कोणाच्या बापाचा नाही; जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर हल्लाबोल

अयोध्या कोणाच्या बापाचा नाही; जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर हल्लाबोल

Jitendra Awhad: अन्नपूराणी चित्रपटात (Annapurani movie) रामाच्या आहारावर वाल्मीकी ऋषींचा एक श्लोक आहे. आता त्या चित्रपटावर बंदी आणणार का? गरीब जितेंद्र आव्हाड भेटला, एकटा राहतो, द्या धमक्या. पण मी अशा धमक्यांना घाबरत नाही. कारवाई काय मला जेलमध्ये टाका, कोणाकोणाला जेलमध्ये टाकणार. ग. दी. माडगुळकर, प्रल्हाद केशव अत्रेंवर करणार, लक्ष्मण शास्त्री जोशींवर करणार कोणाकोणावर कारवाई करणार, वाल्मीकींवर करणार? आम्ही पण अयोध्येला जाणार आहोत. अयोध्या (Ayodhya Ram Mandir) कोणाच्या बापाचा नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपवर केला आहे.

स्त्रीचा आदर कसा करावा, जातभेद कसा मानू नये हे सगळं रामायणात आहे. आदिवासींच्या तोंडातील बोरं आज माहाराष्ट्रात किती जणं खातील? आपण इतका जातीभेद मानणारे लोक आहोत आणि राम त्या जातीभेदावर बोट ठेवतो. रावण मेल्यानंतरही राम लक्ष्मणला सांगतो की शेवटच्या क्षणी तो काय म्हणतो आहे ते ऐक, आपल्याला तो गेल्यानंतर कामी येईल, कारण तो अतिशय हुशार माणूस आहे. राम हा आदर्श आहे, आम्ही त्याला आमचा राम मानतो. आम्ही बहुजनांचा राम मानतो त्याला. त्याच्या सवयी या बहुजनांच्या सवयी आहेत. तो क्षत्रिय आहे. आम्ही एवढे बोलल्यावर तुम्हाला माझ्यावर चिडायचे कारण काय? मी काय चुकीचे बोललो? माझी हत्या करण्यापर्यंत तुम्ही पोचलात? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

‘रामजन्मभूमीच्या संघर्षांच्या वेळी काही लोक शेपट्या घालून…’; फडणवीसांची ठाकरेंवर बोचरी टीका

ते पुढं म्हणाले की विचारांचा वाद असेल तर तुम्ही माझ्याशी वाद घाला. अजून खूप पुरावे द्यायचे आहेत. मी कालपासून गप्प बसलेलो होतो, अपमान सहन करत होतो. कोण कोणता परमाणूस डायरेक्ट माझी गर्दन छाटूंगा बोलला. मी रामभक्त आहे त्यामुळे मला मर्यादा आहे. मी रामाविषयी वाईट बोललेलो नाही.

कोकणातील उद्योगांवरुन अजित पवारांचा ठाकरेंना सवाल, विरोध कशाला करता?

राम, लक्ष्मण, सीता यांची कहाणी आपल्या आयुष्यात खुप काही शिकवून जाते. भावाचं एकमेकांवर किती प्रेम असावं? आणि आजच्या राजकारणात भाऊ बहिणीला मारतोय. हेच बघायला मिळतंय. मी काल खेद व्यक्त केला आहे. आजही व्यक्त करतो. दररोज चिमटा काढला की दररोज पुरावे येतील. कोणी बोलायचं नाही. आम्ही सांगतो तेच खरं. पण इतिहास नेहमी बदलत असतो. मला जर तुम्ही डिवचले नसते तर एवढा अभ्यास केलाच नसतो. मी काल 48 तास पुस्तकातच घुसलो, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube