महाविकास आघाडीने संजय राऊतांचं धर्मांतरण केलंय, आमदार नितेश राणेंची टीका

महाविकास आघाडीने संजय राऊतांचं धर्मांतरण केलंय, आमदार नितेश राणेंची टीका

Trimbakeshwar Temple : महाविकास आघाडीने संजय राऊतांचं धर्मांतरण केलंय, अशी खोचक टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर केलीय. दरम्यान, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाचा वाद मिटलेला असताना आज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाआरती केली आहे. त्यानंतर राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

UPSC 2022 Result : यूपीएससीमध्ये सारथीचा ‘डंका’, तब्बल सतरा जणांनी मारली बाजी

नितेश राणे म्हणाले, धूप दाखवण्याच्या बहाण्याने काही जिहादी विचारांचे युवक मंदिर प्रवेशाजवळ आले होते. जिहादी विचारांचे युवक जेव्हा आले होते तेव्हा मंदिर बंद होतं. मागच्या वर्षी केलेला प्रयोग त्यांना यावर्षीही यशस्वी करायचा होता. मंदिरात प्रवेश करुन त्यांना त्यांचा हेतू सिद्ध करायचा होता. मात्र, त्यांचा हा डाव त्र्यंबकेश्वर मंदिर समितीच्या लोकांना हाणून पाडला असल्याचं ते म्हणाले आहेत.

WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडिया सज्ज, दिग्गज खेळाडू इंग्लंडला रवाना

जर जिहादी विचारांच्या युवकांनी मंदिरात प्रवेश केला असता तर अनर्थ झाला असता, असंही ते म्हणाले आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिर वादावर संजय राऊतांनी असा कुठलाही वाद झालेला नसल्याचं म्हटलं होतं. त्यावर नितेश राणे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात मी आणि माझं कुटुंब अनेकदा जात असतो. ताज्या वादाविषयी मी स्थानिकांकडून माहिती घेतली. कुणीही मंदिरात जबरदस्तीने घुसल्याची माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून एक पत्र त्यांना द्यायला लावलं, असं संजय राऊत म्हणाले होते.

Video : असा मिळवा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ!

गुलाब शहा वली बाबा हे त्र्यंबकेश्वर येथील संत होते. त्यांचा दरवर्षी उरूस निघतो. मंदिराच्या गेटवर येऊन आपल्या देवांना धूप दाखवून ते पुढे निघून जातात. ही शंभर वर्षांची परंपरा असल्याचा दावाही संजय राऊतांनी केला होता.

राऊतांच्या या दाव्यानंतर भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी संजय राऊतांना थेट आव्हान देत तुम्ही मला धूप दाखवण्याची कोणती परंपरा आहे ती दाखवाचं असं आवाहन केलं होतं. भोसले म्हणाले, माझं आजही चॅलेंज आहे की ती पत्रकार परिषद नीट ऐकली तर त्यात म्हटलं की ही परंपरा जुनी आहे पण चौकात धूप दाखवण्याची परंपरा आहे. पण यावेळी ते मंदिराच्या प्रवेशद्वारावर का गेले हे आम्हाला कळलं नाही. त्यामुळं संजय राऊतांचे दात घशात घालण्याचं काम केलं आहे. म्हणून राऊतांना माझं आव्हान आहे की त्यांनी धूप मंदिरात दाखवण्याची कोणती परंपरा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube