WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडिया सज्ज, दिग्गज खेळाडू इंग्लंडला रवाना

WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडिया सज्ज, दिग्गज खेळाडू इंग्लंडला रवाना

WTC Final 2023: भारतीय टीम आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी सज्ज झाली आहे. विराट, अश्विनसह दिग्गज खेळाडूंची पहिली तुकडी आज इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय टीम तीन तुकड्यांमध्ये इंग्लंडला जाणार आहे. संपूर्ण संघ आयपीएल फायनलनंतर 30 मे पर्यंत लंडनला पोहोचेल.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली पहिली तुकडी आज इंग्लंडला रवाना होणार आहे. पहिल्या तुकडीमध्ये विराट कोहली, आर अश्विनसह अक्षर पटेल, उमेश यादव, शार्दुल ठाकूर या खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलच्या साखळी सामन्यांनंतर लगेचच पहिली बॅच पाठवण्याची मूळ योजना होती. मात्र, काही खेळाडूंनी नंतर जाण्याची विनंती बीसीसीआयला केली होती. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 30 मे पर्यंत संपूर्ण टीम इंग्लंडला पोहोचणार आहे.

Neeraj Chopra : गोल्डन बॉय नीरज चोप्राने रचला इतिहास, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

जयदेव उनाडकट खांद्याच्या दुखापतीमुळे बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये आहे. तो WTC फायनलसाठी तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. तो 27 मे नंतर इंग्लडला रवाना होऊ शकतो. वेगवान गोलंदाज मुकेश कुमार पहिल्या बॅचचा भाग असेल तसेच ऋतुराज गायकवाड आणि सूर्यकुमार यादव आयपीएल सामन्यांनंतर जाणार आहेत.

The Kerala Story ची कोटी-कोटी उड्डाणे : बॉक्स ऑफिसवर रचला नवा इतिहास

WTC फायनल 2023 साठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद शमी, सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

स्टँडबाय खेळाडू: ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube