Neeraj Chopra : गोल्डन बॉय नीरज चोप्राने रचला इतिहास, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

Neeraj Chopra : गोल्डन बॉय नीरज चोप्राने रचला इतिहास, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

Neeraj Chopra Ranking: भारताचा सुवर्णवीर नीरज चोप्रानं परत एकदा देशाचा मानाचा तुरा उंचावला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आता भालाफेकच्या (Javelin Throw) क्रमवारीमध्ये नंबर 1 खेळाडू बनला आहे. (Neeraj Chopra Ranking) सोमवारी (22 मे) त्याने ही मोठी कामगिरी केली. दरम्यान जागतिक अॅथलेटिक्सने नवी क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेक रँकिंगमध्ये नंबर-1 बनला आहे. या भारतीय स्टारने पहिल्यांदा हे मोठे मानांकन मिळवून इतिहास रचला आहे.

‘या’ दिग्गजांना बरोबर नीरजची लढाई
जागतिक अॅथलेटिक्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार नीरज चोप्राचे सध्या 1455 गुण आहेत. जे सध्याच्या जगज्जेत्या अँडरसन पीटर्सपेक्षा 22 गुणांनी जास्त आहेत. भालफेकच्या जागतिक क्रमवारीमध्ये नीरजने ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सला मागे खेचले आहे . तसेच अँडरसनचे सध्या 1433 गुण आहेत. टॉप-5 रँकिंगमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीम हा देखील राहणार आहे. जागतिक क्रमवारीमध्ये नीरज आणि अँडरसननंतर झेक प्रजासत्ताकचा जेकोब वडलेच तिसऱ्या स्थानावर राहणार आहे. ज्यांचे 1416 गुण आहेत. आणि चौथ्या स्थानावर जर्मनीचा ज्युलियन वेबर आहे, त्याचे सध्या 1385 गुण आहेत. तर चौथ्या स्थानावर पाकिस्तानचा अर्शद नदीम आहे, ज्याचे 1306 गुण आहेत. नीरज आणि अर्शद यांच्यात गुणांमध्ये खूप अंतर आहे.

‘जेवलिन थ्रो’च्या जागतिक क्रमवारीतील टॉप-5 एथलिट्स- नीरज चोप्रा (भारत) : 1455 पॉइंट्स, अँडरसन पीटर्स (ग्रॅनडा) : 1433 पॉइंट्स, जॅकब वडलेज्च (चेक रिपब्लिक) : 1416 पॉइंट्स, जुलियन वेबर (जर्मनी) : 1385 पॉइंट्स, अरशद नदीम (पाकिस्तान) : 1306 पॉइंट्स

नेदरलँडच्या स्पर्धेत होणार सहभागी

नीरज चोप्रानं आपल्या 2023 च्या सीझनची सुरुवात दोहा येथे झालेल्या डायमंड लीग चॅम्पियन बनून केली होती. या स्पर्धेमध्ये नीरजने विक्रमी 88.67 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले होते. आता नीरजला त्याची पुढची स्पर्धा नेदरलँड्सच्या हेंगलो या ठिकाणी खेळायची आहे. ही स्पर्धा फॅनी ब्लँकर्स-कोएन गेम्स आहे, ती 4 जूनपासून सुरू होणार आहे.

यानंतर नीरजला 13 जून रोजी फिनलंडमधील तुर्कू येथे होणाऱ्या पावो नुर्मी गेम्समध्ये स्वतःचे कौशल्य दाखवायचं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिला होता, यामुळे नीरजने मोठा इतिहास रचला होता. भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. या यशानंतर नीरजचा अद्भूत प्रवास सुरू आहे. यावर्षी त्यानं डायमंड लीग जिंकून मोठा इतिहास रचला आणि आता तो जागतिक नंबर 1 भालाफेकपटू बनला आहे.

‘शुभमन गिलच्या बहिणीला अपशब्द वापरल्यास…’; महिला आयोगाचा ट्रोलर्सना थेट इशारा

फ्रान्समधील कामगिरी कायम ठेवण्याची इच्छा

भारतीय भालाफेकपटू निरज हा आशियाई क्रीडा स्पर्धेचा गतविजेता आहे. इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. यावर्षी 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याला आपले विजयी स्थान कायम राखायचे आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube