‘शुभमन गिलच्या बहिणीला अपशब्द वापरल्यास…’; महिला आयोगाचा ट्रोलर्सना थेट इशारा
IPL 2023 : आयपीएल 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात मोठा उलटफेर झाला. शुभमन गिलच्या शानदार शतकामुळे गुजरात टायटन्सने बंगळुरूचा पराभव केला. या पराभवामुळे बेंगळुरू प्लेऑफच्या शर्यतीतूनही बाहेर पडला. टायटन्सच्या विजयाचा हिरो ठरलेल्या शुभमन गिलच्या बहिणीला प्रचंड ट्रोल केले जात आहे. दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी सोमवारी सोशल मीडियावर शुभमन गिलच्या बहिणीच्या ट्रोलवर जोरदार टीका केली आणि असे करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे सांगितले.
एका ट्विटमध्ये स्वाती मालीवाल म्हणाल्या की, शुभमन गिलच्या बहिणीला ट्रोल करणे लज्जास्पद आहे कारण ती ज्या टीमला फॉलो करते ती मॅच हरली. यापूर्वी विराट कोहलीच्या मुलीला शिवीगाळ करणाऱ्यांवर आम्ही कारवाई सुरू केली होती. गिलच्या बहिणीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या सर्वांवर महिला आयोग कारवाई करेल. असे काहीही खपवून घेतले जाणार नाही.
‘WTC’ फायनलपूर्वी भारत टेन्शनमध्ये; विराट कोहली जखमी
गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील रविवारी झालेल्या रोमांचक सामन्यात शुभमन गिलच्या शानदार शतकामुळे टायटन्सने बंगळुरूचा पराभव केला. यामुळे बंगळुरू स्पर्धेतून बाहेर पडला. या सामन्यात गिलने 52 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 104 धावांची खेळी करत बेंगळुरूला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर केले.
Extremely shameful to see trollers abusing #ShubhmanGill’s sister just because the team they follow lost a match. Previously we had initiated action against people abusing #ViratKohli daughter. DCW will take action against all those who have abused Gill’s sister as well. This… pic.twitter.com/eteGtGgPVm
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) May 22, 2023
बेंगळुरू बाहेर पडल्याने मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला. आरसीबीचा पराभव त्यांच्या चाहत्यांना पचवता आला नाही आणि त्यांनी सोशल मीडियावर शुभमन गिल आणि त्याच्या बहिणीला शिवीगाळ केली. आता दिल्ली महिला आयोगाने तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.