The Kerala Story ची कोटी-कोटी उड्डाणे : बॉक्स ऑफिसवर रचला नवा इतिहास

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 23T103508.624

Box Office Collection: सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. पहिल्या दिवसापासून या सिनेमाला भारतीय सिनेप्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर आता या सिनेमाने नवा विक्रम केला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 200 कोटींचा गल्ला जमवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)


‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा सिनेमा रिलीजच्या 18 व्या दिवशी 200 कोटींच्या कल्बमध्ये सामील झाला असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 204.47 कोटींची मोठी कमाई केली आहे. रिलीजच्या तिसऱ्या सोमवारी अर्थात 18 व्या दिवशी या सिनेमाने 5.50 कोटींची कमाई केली आहे. वीकेंडप्रमाणे इतर दिवशी देखील हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे.

‘द केरळ स्टोरी’ या सिनेमात अदा शर्मा (Adah Sharma), सोनिया बलानी, योगिता बिहानी आणि सिद्धी इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. जगभरातील सिनेरसिक या सिनेमाचं कौतुक करत आहेत. कुठे हा सिनेमा करमुक्त व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तर कुठे या महिलांसाठी या सिनेमाचे खास शो आयोजित करण्यात आले आहे.

अंगावर शहारे आणणारा हा सिनेमा 300 कोटींचा गल्ला कमावला आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जगभरात या सिनेमाची मोठी क्रेझ दिसून येत आहे. अभिनेत्री अदा शर्माने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘भारतीय प्रेक्षकांना शुभेच्छा. ज्या लोकांनी होर्डिंग्स लावले, पेंटिंग्स केले, व्हिडीओज पोस्ट केले, चित्रपटाचं कौतुक केलं, सिनेमासाठी विविध राज्यांमध्ये प्रवास केला अशा सर्वांना शुभेच्छा. तुमचा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे.

https://letsupp.com/entertainment/urfi-javed-bold-photo-social-media-viral-49706.html

 

वर्षातील तिसरा सर्वात मोठा बॉलीवूड चित्रपट

‘द काश्मीर फाइल्स’ने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या कलेक्शनचा आकडा आरामात पार केला आहे. सलमानच्या ईदला रिलीज झालेल्या लाइफटाईम कलेक्शनने 110 कोटींचा आकडाही गाठला नाही. ‘पठाण’ आणि ‘तू झुठी मैं मक्कर’ नंतर ‘द केरळ स्टोरी’ आता 2023 चा तिसरा सर्वात मोठा बॉलिवूड चित्रपट बनला आहे.

‘द केरळ स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर 9 दिवसात हिट

‘द केरळ स्टोरी’ हा वाद आणि चर्चेत अजूनही कायम आहे, पण चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट सुरूच आहे. पहिल्या दिवसापासूनच्या कमाईने आश्चर्यचकित करणारा, ‘द केरळ स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर ‘द काश्मीर फाइल्स’ प्रमाणेच करिष्मा करत आहे. पहिल्या 3 दिवसातच ब्लॉकबस्टर घोषित झालेल्या अदा शर्माच्या चित्रपटाने आठवड्याच्या मध्यभागी ज्या प्रकारे चांगली कमाई केली होती, ते पाहता दुसरा वीकेंड चित्रपटासाठी जबरदस्त कलेक्शन घेऊन येणार आहे हे निश्चित.

Tags

follow us