ब्राह्मण समाजासाठी मोठा निर्णय! परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणार, मंत्रीमंडळात येणार प्रस्ताव

  • Written By: Published:
ब्राह्मण समाजासाठी मोठा निर्णय! परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणार, मंत्रीमंडळात येणार प्रस्ताव

Parashuram Financial Corporation : गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील समस्त ब्राह्मण समाजाकडून स्वतंत्र परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी होत होती. ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने वारंवार सरकार दरबारी ही मागणी रेटून धरली होती. काहीच दिवसांपूर्वी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. स्वतंत्र परशुराम आर्थिक महामंडळ (Parashuram Financial Corporation) स्थापन करावे, तसेच समाजातील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण मिळावे, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आता शासनाने राज्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

अर्थसंकल्पातून जनतेच्या पदरात काहीच नाही पडलं; जयंत पाटलांची खोचक टीका 

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असताना ब्राह्मण समाजही आक्रमक झाला होता. अलीकडेच छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर ब्राह्मण संघटनांकडून धडक मोर्चा काढण्यात आला होता. ब्राह्मणांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, तसेच समाजातील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण मिळावे या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

Budget 2024 सादर होताच सेन्सेक्स कोसळला; गुंतवणुकदारांचे 35 हजार कोटी बुडाले 

त्यानंतर १४ डिसेंबर रोजी ब्राम्हण समाज संघर्ष समिती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत ब्राम्हण समाजातील आर्थिक मागास घटकातील तरुणांना व्यावसायिक मदतीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं व त्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर सरकाराने याबाबत सकारात्मक पावले उचलली आहे. सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबतचा मंत्रीमंडळ प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण विभागाला दिले आहेत

ब्राम्हम समाजाला कोणत्याही महामंडळाकडून आर्थिक लाभ मिळत नाही. त्यामुळं ब्राम्हण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी होत होती. दरम्यान, शासनाने ब्राम्हण समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र पशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत हिरवा कंदील दाखवला. त्यामुळं ब्राम्हण समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळं राज्यातील आर्थिक-सामाजिक विकासाला चालना मिळू शकते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज