Budget 2024 सादर होताच सेन्सेक्स कोसळला; गुंतवणुकदारांचे 35 हजार कोटी बुडाले
Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.1 फेब्रुवारी) सादर केला. मात्र या बजेट मधून शेअर मार्केटला (Share Market) बळ न मिळाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही कोसळले. यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 35 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांचे 35 हजार कोटींचे नुकसान झालं.
पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरीची संधी, विविध पदांच्या 65 जागांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?
इक्विटी बेंच मार्क इंडेक्स बद्दल सांगायचं झालं तर आज सेन्सेक्स 106.81 म्हणजे 0.15 टक्क्यांनी घसरत ७१६४५.३० आणि निफ्टी 28.25 म्हणजे 0.13 टक्क्यांनी घसरत 21 हजार 697.45 वर बंद झाली. सेक्टर वाईज सांगायचं झालं तर निफ्टी चे मीडिया मेटल पीएसयु बँक आणि रियल्टी हे सोडून सर्व इंडेक्स कमकुवत होते त्यामुळे निफ्टी बँक 0.16 टक्क्यांनी घसरत बंद झाला.
‘मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प’; उद्धव ठाकरेंनी सांगितली भविष्यवाणी
आजच्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅपिटल एक्सपांडिचर मध्ये ११ टक्क्यांनी वाढ केली तरीदेखील शेअर मार्केटमध्ये यामुळे सकारात्मक बदल घडला नाही. त्याचबरोबर अमेरिकी फेडने संकेत दिल्यानुसार महागाईचा दरही कमी होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे आज शेअर मार्केटमध्ये बँका एफएमसीजी आणि ऑटो सेक्टर सोडून बाकी कोणत्याही सेक्टरचे शेअर्स वधारू शकले नाही.
अमित ठाकरे नगर दक्षिण लोकसभा लढवणार? मनसेनं आवळला सूर
दरम्यान मार्केटमध्ये घसरण झाल्याने आज गुंतवणूकदारांचे पैसे अक्षरशः बुडाले आहेत. तर सेन्सेक्स वरील तीस लिस्टेड शेअर्स पैकी फक्त नऊ शेअर्स ग्रीन झोन मध्ये होते ज्यामध्ये सर्वात तेजीत होता तो म्हणजे मारुती तर दुसरीकडे एल अँड टी अल्ट्राटेक सिमेंट आणि जेएसडब्ल्यू स्टील या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरील मिळालेल्या माहितीनुसार आज तीन हजार 942 शेअर्सचे ट्रेडिंग झालं ज्यामध्ये केवळ 1813 शेअर्स तेजीत होते तर 2028 झाली होती. ज्यामध्ये 101 शेअर्स असे होते त्यात कोणताही बदल झाला नाही.