Budget 2024 : दरमहिना 300 यूनिट मोफत वीज अन् 18 हजारांची बचत होणार अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Budget 2024 : दरमहिना 300 यूनिट मोफत वीज अन् 18 हजारांची बचत होणार अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.1 फेब्रुवारी) सादर केला. सादर करण्यात आलेलं हे बजेट अंतरिम असलं तरी, या अर्थसंकल्पात सीतारामन ( Nirmala Sitaraman ) यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकरी’ हे सरकारचं प्राधान्य असल्याचं सूचित केलं आहे. यामध्ये एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. ती म्हणजे ‘रूफटॉप सोलर’ या योजनेअंतर्गत दरमहिना 300 यूनिट मोफत वीज मिळणार आहे. तसेच यातून 18 हजारांची बचत होणार आहे.

…तर मविआ कोल्हापुरातून संभाजीराजेंना उमेदवारी देणार? आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये एकमत 

बजेट सादर करताना निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली, ‘रूफटॉप सोलर’ या योजनेअंतर्गत दरमहिना 300 यूनिट मोफत वीज मिळणार आहे. तसेच यातून 18 हजारांची बचत होणार आहे. या अगोदर 22 जानेवारीला पंतप्रधान मोदी यांनी या योजनेसाठी बैठक घेतली होती. प्रधानमंत्री सूर्योदय योजना असं या योजनेचं नाव आहे.

Sanjay Raut : ‘मनसे’ला महाविकास आघाडीत घेणार का? राऊतांनी थोडक्यात क्लिअरच केलं

यामुळे प्रत्येक घराच्या वीजेचा वापर कमी होणार आहे. तसेच वीजेच्या गरजेसाठी देश आत्मनिर्भर बनणार असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर राहिवासी क्षेत्रातील लोकांना त्यांच्या घराच्या छतावर मोठ्या प्रमाणात ‘रूफटॉप सोलर’ या योजनेअंतर्गत सोलार सिस्टिम बसवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासाठी एक व्यापक अभियान सुरू केलं जाणार आहे.

‘रूफटॉप सोलर’ या योजनेसह या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी आणखी काही घोषणा करण्यात आल्या. त्यामध्ये पुढच्या 5 वर्षांत गरीबांसाठी 2 कोटी घरं बांधणार देशात 15 नवी एम्स रुग्णालये तयार करणार, 10 वर्षापूर्वीचा 10 हजारपर्यंतचा टॅक्स माफ, टॅक्सस्लॅबमध्ये बदल नाही, 7 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात येणार आहे. अशा घोषणा करण्यात येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज