होय, हे खरय! भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मोबाईल, इंटरनेट वापरत नाहीत

डोवाल हे इंटरनेट का वापरत नाहीत? याची देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. ते म्हणतात आपण इंटरनेटचा वापर करत नाही.

  • Written By: Published:
News Photo   2026 01 11T140700.771

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी एक मोठा खुलासा केला आहे. (Doval) डोवाल यांनी सांगितलं की मोबाईल फोन आणि इंटरनेटचा ते कधीही वापर करत नाहीत. या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय राहु शकत नाही. तिथे देशातील एका उच्च पदस्थ व्यक्ती विना स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय कसा राहू शकतो हे अनेकांसाठी आश्चर्य आहे.

मोठी बातमी : फिर एक बार अजित डोवाल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी तिसऱ्यांदा डोवाल यांची नियुक्ती

डोवाल हे इंटरनेट का वापरत नाहीत? याची देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. ते म्हणतात आपण इंटरनेटचा वापर करत नाही. मोबाईल फोनही जवळ बाळगत नसल्याचं ते म्हणाले. तुम्हाला ही माहिती कुठून कळली ते मला माहिती नाही, पण मी खरंच इंटरनेटचा वापर करत नाही. फोनचा पण वापर करत नाही. पण खास माहितीसाठी आणि कुटुंब, मित्र यांच्याशी संवाद साधण्यासाठी फोनचा वापर करावा लागतो. पण ते प्रमाण कमी आहे. आपण डिजिटल जगतापासून दूर असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

का नाही वापरत फोन-इंटरनेट?

त्याचबरोबर पुढं बोलताना ते म्हणतात हा दिखावा नाही. तर एक विचारपूर्वक कृती आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराकडं दहशतवाद, गुप्त चाल, खास धोरण, निर्णय, आंतरराष्ट्रीय कुटनीतीसंबंधीची अत्यंत संवेदनशील माहिती असते. आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हॅक होऊ शकतो. लोकेशन ट्रॅक होऊ शकतं. त्यामुळे कोणतीही जोखीम नको म्हणून या साधनांचा ते वापर करत नाहीत.

तो अनुभव गाठीशी

अजित डोवाल यांचं संपूर्ण आयुष्य हे गुप्तहेर संघटना IB शी जोडलेले आहे. त्यांनी पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून काम केलेलं आहे. शत्रू अगोदर डिजिटलरित्या तुमचा पाठलाग करतो हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे आपला कोणी माग काढू नये आणि आपण कुठे आहोत हे कळू नये यासाठी डोभाल हे फोन आणि इंटरनेटचा वापर करत नाहीत. डोवाल यांना यांना सुपर स्पाय अथवा भारताचे जेम्स बॉन्ड म्हटल्या जाते. दशकापर्यंत ते गुप्तहेर जगातातील एक अजब रसायन म्हणून ओळखल्या जातात.

follow us