NSA अजित डोभाल यांचं फेसबूक अकाउंट नाहीच; सोशल मीडियावरील अकाउंट फेक, PIB चा खुलासा

NSA अजित डोभाल यांचं फेसबूक अकाउंट नाहीच; सोशल मीडियावरील अकाउंट फेक, PIB चा खुलासा

Is NSA Ajit Doval on Facebook : भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू असतानाच (India Pakistan War) सोशल मीडियावर खोट्या पोस्ट आणि व्हिडिओंचा अक्षरशः पूर आला आहे. कोणत्याच माहितीची खात्री न करता, त्याची सत्यता न तपासता माहिती पोस्ट केली जात आहे. व्हिडिओ शेअर केले (Pahalgam Attack) जात आहेत. अशातच एक फेसबूक अकाउंट वेगाने (Social Media) व्हायरल होत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (Ajit Doval) यांचं हे अकाउंट आहे असा दावा केला जात आहे.

परंतु, आता या अकाउंटबाबत मोठी माहिती समोर आली आहे. PIB Fact Check ने स्पष्ट केले आहे की हे अकाउंट पूर्णपणे फेक आहे. अजित डोभाल यांचे कोणतेही अधिकृत फेसबूक अकाउंट नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तेव्हा अशी कोणतीही माहिती अथवा व्हिडिओ शेअर करताना विचार करा. चुकीच्या गोष्टी आणि माहिती शेअर करू नका.

याबाबत अधिक माहिती अशी, सोशल मीडियावर अजित डोवाल यांच्या नावाने एक फेसबूक अकाउंट व्हायरल होत आहे. यात एक पोस्टही टाकण्यात आली आहे. पाकिस्तानबाबत ही पोस्ट होती. अजित डोवाल यांच्याच अकाउंटवरून ही पोस्ट आहे असा संभ्रम निर्माण झाला होता. नंतर पीआयबीने या पोस्ट आणि अकाउंटची सत्यता तपासली.

India-Pak War : पाकिस्तानची आता खैर नाही; मोदी सरकारचा लष्करप्रमुखांना विशेष अधिकार

पीआयबीचा खुलासा नेमका काय

या पोस्टमधील भाषाही थोडी वेगळीच होती. या माध्यमातून खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवण्याचा प्रयत्न झाला. सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. लोकांना अलर्ट केले. PIB Fact Check टीमने खात्री करुन सांगितले आहे की अजित डोवाल सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर सक्रिय नाहीत. त्यांच्या नावाने तयार करण्यात आलेले अकाउंट बनावट आहे. सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

फेक प्रोफाइलची माहिती द्या

याबाबत सायबर तज्ज्ञांनीही सतर्क केले आहे की फेक अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या कोणतीही खरी आहे असे समजून शेअर करू नका. असे केल्याने तुमचा डेटा धोक्यात येईलच शिवाय देशाच्या सुरक्षेलाही धोका उत्पन्न होऊ शकतो. जर तुम्हाला कोणत्याही व्हिआयपी अधिकारी किंवा नेत्याच्या नावाने सोशल मीडियावर प्रोफाइल दिसली तर आधी त्याची अधिकृत खात्री करा. सरकारी वेबसाइट्स, PIB किंवा व्हेरिफाइड अकाउंटकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवा असे आवाहन सरकारने केले आहे.

थेट कव्हरेज टाळा, पाकिस्तान युद्धा दरम्यान केंद्र सरकारचे मीडियाला निर्देश

follow us
  • fb
  • instagram
  • youtube