Nepal Protest : ओलींनंतर नेपाळच्या राष्ट्रपतींचाही राजीनामा; थोड्यावेळात घोषित होणार नवे PM

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपतींनीदेखील राजीनामा दिला आहे. देशात भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला.

  • Written By: Published:
Nepal Protest Live : नेपाळमध्ये GenZ पिढीचा धुमाकूळ; आतापर्यंत काय काय घडलं?

Nepal Protest Live Updates : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीनंतर हिंसक झालेल्या GenZ पिढीनं धुमाकूळ घातला आहे. तरूणांकडून उग्र पद्धतीने सुरू करण्यात आलेल्या आंदोलनानंतर अखेर सरकारने सोमवारी (दि. ८) आपला निर्णय मागे घेतला. तीन दिवसांपूर्वी, सरकारने फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि व्हॉट्सअॅपसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media) बंदी घालण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाच्या निषेधार्थ राजधानी काठमांडूसह अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने झाली. निदर्शक आणि पोलिसांमधील संघर्षात आतापर्यंत किमान १९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. नेपाळमध्ये (Nepal Protest) आतापर्यंत काय काय घडलं? याचे प्रत्येक क्षणाचे अपडेट देणारा लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग… Nepal Protest Live Updates

LIVE NEWS & UPDATES

  • 09 Sep 2025 05:20 PM (IST)

    नेपाळच्या राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

    पंतप्रधान कोपी ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही राजीनामा दिला असून, पुढील काही तासात नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

  • 09 Sep 2025 04:21 PM (IST)

    नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरून हाहाकार! वाचा, भारतातील नियम काय?

    फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या सर्व छोट्या, मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदीमुळे नेपाळमध्ये हालचाली टोकाला गेल्या आहेत. या बंदीविरूद्ध निषेध म्हणून नेपाळच्या अनेक शहरांमध्ये आणि भागात तरुणांनी आक्रमक आंदोल पुकारलं आहे. याच धर्तीवर भारतात सोशल मीडिया वापरण्याचे नियम नेमके काय? वाचा खालील लिंकमध्ये

    नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरून हाहाकार! पंतप्रधानांचा राजीनामा; वाचा, भारतातील नियम

  • 09 Sep 2025 04:18 PM (IST)

    नेपाळची संसद पेटवली! आंदोलन भडकावणारा ‘सुंदान गुरुंग’ आहे तरी कोण?

    तरुणांचं हे आंदोलन एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलंय, तो सामाजिक कार्यकर्ता म्हणजे सुंदान गुरुंग (Sundan Gurung). आंदोलनाद्वारे थेट पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

    Nepal Protest : नेपाळची संसद पेटवली! आंदोलन भडकावणारा ‘सुंदान गुरुंग’ आहे तरी कोण?

  • 09 Sep 2025 04:08 PM (IST)

    नेपाळमधील भारतीयांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी

    सोशल मीडियाच्या बंदीवरून नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलनं केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने सूचना जारी केली आहे. ज्यामध्ये परिस्थिती स्थिर होईपर्यंत भारतीय नागरिकांना नेपाळमध्ये प्रवास करणे टाळावे तसेच नेपाळमध्ये वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. शिवाय काठमांडू येथील भारतीय दूतावासाने हेल्पलाईन नंबर्स जारी केले आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत किंवा मदतीची आवश्यकता असल्यास, काठमांडू येथील भारतीय दूतावासातील +९७७ – ९८० ८६० २८८१ आणि +९७७ – ९८१ ०३२ ६१३४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube