ब्रेकिंग : नेपाळच्या पंतप्रधानांनी दिला राजीनामा, भ्रष्टाचार अन् सोशल मीडिया बंदीविरोधात आंदोलन पेटलं
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अखेर राजीनामा दिला आहे. देशात भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला.

Nepal Prime Minister KP Sharma Oli Resigned : नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अखेर राजीनामा दिला आहे. देशात भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला. आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत किमान 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
सोशल मीडिया बंदीविरोधात आंदोलन
याआधीच नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखख यांनीही आपल्या पदाचा (Nepal) राजीनामा दिला होता. वाढत्या जनआक्रोशामुळे सरकारवर (social media ban) प्रचंड दबाव आला होता. विशेषतः सोशल मीडिया बंदीविरोधात तरुणांचा संताप मोठ्या प्रमाणावर (Nepal Goverment) व्यक्त झाला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान ओली यांना गादी सोडावी लागली आहे.
सध्या नेपाळमध्ये राजकीय अनिश्चितता निर्माण झाली असून, पुढील पंतप्रधान निवडीसाठी हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचारविरोधी लढा आणि लोकशाही हक्कांच्या प्रश्नावरून पेटलेला संघर्ष आता राजकीय संकटात परिवर्तित झाला आहे.
सरकारच्या 10 हून अधिक मंत्र्यांचा राजीनामा
नेपाळमधील निदर्शकांनी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या निवासस्थानाला आग लावली होती. सोमवारपासून सुरू झालेले विद्यार्थ्यांचे हे निदर्शन मंगळवारी देशभर पसरले आहे. हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारच्या 10 हून अधिक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहेनेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपत्कालीन परिस्थितीत आपले प्राण वाचवण्यासाठी खाजगी विमानाचे विमान तयार ठेवले असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, निदर्शक पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याशिवाय दुसरे काहीही ऐकण्यास तयार नव्हते. अखेर पंतप्रधानांनी पदाचा राजीनामा दिला.
आंदोलक संतापले
ओली यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शकांनी त्यांचे निवासस्थान जाळले आहे. निदर्शकांनी बालाकोटमधील पंतप्रधान ओली यांच्या निवासस्थानाला आग लावली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, निदर्शकांच्या एका मोठ्या गटाने घरात असलेल्या वस्तू बाहेर काढल्या होत्या, त्यानंतर त्यांनी आवारात प्रवेश केला. घराच्या काही भागांना आग लावली. आग पसरताच, निवासस्थानातून धुराचे लोट उठताना दिसले. त्याच वेळी, देशाचे ऊर्जा मंत्री आणि राष्ट्रपतींची घरे देखील निदर्शकांनी जाळली आहेत. निदर्शक ‘केपी चोर, देश सोडून जा, भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करा’ अशा घोषणा देत आहेत. निदर्शकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांचे निवासस्थान पूर्णपणे जाळून टाकले आहे.