Nepal Flood : देव तारी त्याला कोण मारी; ढिगाऱ्याखाली पाच वर्षांची मुलगी जिवंत सापडली

Nepal Flood-रासुवा जिल्ह्यातील स्याब्रुबेसी परिसरात बचाव पथकाला ढिगाऱ्याखालून आवाज ऐकू आला. हा आवाज मांजराचा असावा, असे सुरुवातीला बचाव पथकाला वाटले.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Nepal Flood

Nepal Flood : ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही मराठीत प्रसिद्ध म्हण आहे. तशीच घटना पुराने उद्धव्स्त झालेल्या नेपाळमध्ये (Nepal Flood) घडलीय. शोध पथके मृतदेह सापडत असताना मांजर ओरडण्यासारखा आवाज आला. पथकाने ढिगाऱ्याखाली शोध घेतला. त्यावेळी ढिगाऱ्याखाली पाच वर्षांची मुलगी जिवंत आढळून आलीय. दोन दिवसांपासून ही मुलगी ढिगाऱ्याखाली अडकून पडली होती. ती जिवंत आढळून आल्याने एक चमत्कार मानला जात आहे.


97 वर्षीय गुना माया बोहरा ठरल्या नेपाळच्या आपत्तीत ‘आशेचा चेहरा’; मृत्यूच्या तोंडातून योद्ध्यासारख्या परतल्या!

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर बचावकार्य सुरू आहे. त्याचवेळी एक हृदयस्पर्शी घटना समोर आलीय. रासुवा जिल्ह्यातील स्याब्रुबेसी परिसरात बचाव पथकाला ढिगाऱ्याखालून आवाज ऐकू आला. हा आवाज मांजराचा असावा, असे सुरुवातीला बचाव पथकाला वाटले. मात्र, ढिगारा हटवल्यानंतर त्यांना त्याखाली तब्बल दोन दिवसांपासून अडकलेली पाच वर्षांची मनिषा जिवंत अवस्थेत आढळली. त्यानंतर तिला काठमांडूतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर आहे आणि ती उपचारांना प्रतिसाद देत आहे. पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या प्रचंड विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर मनिषाची जिवंत सुटका हा नेपाळसाठी आशेचा एक किरण ठरला आहे.


मोठी बातमी ! भाजप मित्रपक्षाच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची हिसकविणार ? नऊ आमदार थेट पक्षात विलिन होणार

नेपाळ सशस्त्र पोलीस दलाचे अधिकारी संजू खत्री यांनी याबाबत माहिती दिली आहे. पथकाने शोधमोहीम सुरू केली आणि ढिगारा हटवण्यास सुरुवात केली. काही वेळाने त्यांना माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली मनिषा अडकलेली आढळली. मनिषाला बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला सुमारे दोन तास लागले. बचावकार्याचा व्हिडिओही समोर आला असून, त्यात चिमुकलीला ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढताना दिसून आले आहे. मनिषाला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी बचाव पथकाने हेलिकॉप्टरची मागणी केली. मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला उड्डाण करता आले नाही. त्यामुळे बचाव पथकाने मनिषाला त्यांच्या बचाव छावणीत नेले. तिथे तिच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर तिथे ती शुद्धिवर आली. बचाव पथकाने तिची काळजी घेतली आणि अखेर तिला काठमांडूला विमानाने नेण्यात आले. शनिवारी दुपारी मनिषाला काठमांडूतील टीचिंग हॉस्पिटलच्या बालरोग आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी मनिषाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. रविवारी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, मनिषाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

follow us