मुंबईचा महापौर भाजपचा नाही, तर महायुतीचा होणार…CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं
मुंबईचा महापौर भाजपचा नाही, तर महायुतीचा होणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट सांगितलंय. ते नागपुरात बोलत होते.
Devendra Fadanvis आगामी काळात महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून, उमेदवारांकडून आपापल्या वार्डात जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच आता मुंबईत नेमका महापौर कोणाचा होणार? याची चर्चा रंगली होती. अखेर या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पूर्णविराम देऊन टाकलायं. मुंबईचा महापौर भाजपचा नाही, तर महायुतीचा होणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट सांगितलंय. ते नागपुरात बोलत होते. त्यामुळे आता महायुतीचाच महापौर होणार असल्याचं बोललं जात आहे.
‘पार्थ पवार कुकूलं बाळ नाहीत, त्यांनी फ्रॉड केलाय’; अंजली दमानिया यांचा अजित पवार यांच्यावर संताप
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महायुतीतमधील कोणतेही कार्यकर्ते नाराज नाहीत. यासंदर्भातील चित्र कुठेही दिसून येत नाही. सध्या आमच्यासाठी मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणे अधिक महत्वाचे असून आम्ही विकासोन्मुख आणि पारदर्शी शासन आणण्यासाठई हा निर्णय घेत आहोत. मुंबईत भाजपचा नाही तर महायुतीचा महापौर होणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.
तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्याबाबत विविध दावे करण्यात येत आहेत. मात्र, केवळ जिंकणे हाच आमचा फॉर्म्युला राहणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत ५५ जागांची भाजपने मागणी केलेली नाही. तेथे केवळ शिवसेना व भाजप हेच प्रमुख जागा आल्या होत्या. आम्ही आपापसांत बसून जागावाटप करू, असे मुख्यमंत्र्यांनी पक्ष आहेत. मागील वेळी भाजपच्या ४२ स्पष्ट केले.
‘या’ लोकांना व्यवसायात मिळणार यश; जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा राहणार ?
एकाच घरातील पाच जण पीएच.डी. करत शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वक्तव्य केले होते. शासनाने ही योजना हुशार मुलांसाठी सुरू केली आहे. एका घरातील पाच लोक योजनेचा लाभघेतील, तर इतर घरांतील गरजू व होतकरू तरुणांना त्याचा लाभ मिळणार नाही. अजित पवार यांचे बोलणे रास्त आहे, असे फडणवीस म्हणाले.
